आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशानंतर राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर नेहमीच गंभीर आरोप होतो. आता आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीच हे प्रकरण पुन्हा उकरून काढल्याने पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.(rahul kanal demand inquiry to cm eknath shinde disha salian and sushant rajput case)
ADVERTISEMENT
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची कसून चौकशी करा अशी मागणी राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. यासोबत जर या प्रकरणात माझे नाव समोर आले तर मी राजकारण सोडून माझं डोक आणि तुमचं बुट असेल,असे राहुल कनाल म्हणाला आहे. आम्ही सर्व आपल्याला लहानपणापासून पाहत आलोय. आपल्याकडून शिकत आलोय. आम्ही राजकारणात आलो तेव्हा हे मी भाग्य समजतो. 32 वर्षापासून माझे वडील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची भेट घडवून आणली होती. मला चांगल्याप्रकारे आठवत आहे, अशी आठवण राहुल कनाल यांनी सांगितली.
हे ही वाचा : ‘समृद्धीवर कोणी गेलं की लोकं म्हणतात देवेंद्रवासी झाला…’, शरद पवार असं का म्हणाले?
मी आपल्यासोबत यायचा निर्णय़ घेतला तेव्हा दोन-तीन दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा कानावर ऐकायला येत आहेत. कुणी म्हणतंय की, आपल्याला पक्षाने भरपूर काही दिलं. पण त्याच्या हजार टक्के मी नाही दिलं तर तुम्ही सार्वजनिकरीत्या येऊन बोलून दाखवा, असे थेट आव्हानच राहुल कनाल यांनी दिले.
तसेच शिंदे सरकारच्या भितीमुळे किंवा पैशामुळे पक्षात प्रवेश करतायत असे लोकांचे म्हणणे आहे. पण मी पक्षाचे काम आणि सेवा करण्यासाठी आलोय, असे राहुल कनाल म्हणालाय. दिशा सॅलियनची चौकशी सुरु केल्यामुळे मी शिंदे गटात प्रेवश केला आहे असाही आरोप आहे. पण मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची कसून चौकशी करा आणि जर या प्रकरणात माझे नाव समोर आले तर मी राजकारण सोडून माझं डोक आणि तुमचं बुट असेल,असे राहुल कनाल म्हणाला आहे.
आदित्य ठाकरे म्हणायचे ”हा माझा वाघ आहे आणि दिल्लीसमोर झुकणार नाही”. आणि हेच आदित्य 10 वर्षांच्या माझ्य़ा मेहनतीर आता मला चोर म्हणतायत, असे राहुल कनाल म्हणाले. बात घमंड की नही इंजत की है, लोगोने अपने लेहजे बदल दिये, हमने अपने रास्ते बदल दिए, असा शेवटी राहुल कनाल यांनी शेर देखील मारला.
ADVERTISEMENT