Barsu Refinery : बारसूसाठी पंतप्रधानांना पत्र अन् ठाकरेंचा दुटप्पीपणा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई तक

26 Apr 2023 (अपडेटेड: 26 Apr 2023, 06:22 AM)

Cm Eknath Shinde criticize Udhhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्नाटकमधून उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहल्याची प्रतिक्रिया दिली होती. आता याच प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भुमिका मांडलीय.

rajapur barsu refinery cm eknath shinde criticize udhhav thackeray

rajapur barsu refinery cm eknath shinde criticize udhhav thackeray

follow google news

Cm Eknath Shinde criticize Udhhav Thackeray : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात विरोधकांनी सरकारला घेरले असतानाच, सत्ताधारी पक्षाने या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहण्याचा मुद्दा उचलून धरलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कर्नाटकमधून उद्धव ठाकरेंनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहल्याची प्रतिक्रिया दिली होती. आता याच प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भुमिका मांडलीय. (rajapur barsu refinery cm eknath shinde criticize udhhav thackeray)

हे वाचलं का?

बारसू ग्रीन रिफायनरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. त्यामुळेच पंतप्रधानांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता.ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही? त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती की विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या ? आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मुख्यमंत्र्यांनी ठाकरेवर केली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध केला होता, मात्र मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला,असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका देखील त्यांनी ठाकरेंवर केली.

हे ही वाचा :  ‘आधी बोंबाबोंब, अन् नंतर…’, उद्योगमंत्री उदय सामंत ठाकरेंवर चिडले

बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे आणि यामुळे प्रदुषण होणार नाही, अशाप्रकारचे त्यांनी आश्वस्त केले आहे. बारसू या ठिकाणी रिफायनरी व्हावी, तिथल्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हजारो कोटींची गुंतवणूक तिकडे होऊ शकते,असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

तसेच मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर गेल्याची चर्चा होती. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सुट्टीवर नाहीए मी, सध्या डबल ड्यूटीवर आहे. घरी अडीच वर्षे बसलेल्यांनी दोन तीन दिवस इकडे गेला तिकडे गेला हे बोलाव, असा देखील टोला त्यांनी ठाकरेंना लगावला. तसेच आरोप करणाऱ्यांना काहीच कामधंदा नाही आहे, आता त्यांना घरी बसवलंय. घरी बसवलंय म्हणून आरोप करताय. आम्ही आरोपांचे उत्तर आरोपाने नव्हे तर कामाने देऊ, असे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : ‘खुलेआम या,मी स्वत: येतो’, भास्कर जाधव सरकारला थेट भिडणार?

भाजप-शिवसेना युतीच जिंकेल

महाबळेश्वरच सुशोभिकरण, रस्ते,दिवाबत्ती, पर्यटन स्थळे, वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठीच्या बांबीवर चर्चा झाली. यावेळी जवळपास 900 ते 1000 कोटीचे कामे आपण मंजूर केले आहेत. तापोळामध्ये होणाऱ्या ब्रीजचे कामकाज पाहिले. तसेच तापोळा महाबळेश्वर मेन रोडचे भूमिपूजन केले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. यासोबतच 2024 च्या निवडणूकीच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, 2024 च्या निवडणूकीला अद्याप वेळ आहे, 2024 पर्यत आम्ही काम करतोय, 7-8 महिने इतकी काम केलीय आहे की भाजप-शिवसेना युती जिंकेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

    follow whatsapp