Rajya Sabha Election 2024 : देशातील तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या 15 जागांसाठी मंगळवारी (28 फेब्रुवारी) झालेल्या निवडणुका धक्का देणाऱ्या ठरल्या. यावेळी काँग्रेसमधील बंडखोरांना हाताशी धरून उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात भाजपने क्रॉस व्होटिंगच्या बळावर विजय मिळवला, तर कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली.
ADVERTISEMENT
कर्नाटकात काँग्रेसला तीन जागा जिंकता आल्या. या तीन जागांवर अजय माकन, नासिर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर विजयी झाले होते. दुसरीकडे भाजपचे उमेदवार नारायण सा. भांडगे यांनी एका जागेवर विजय मिळवला. त्याच वेळी, पाचवे उमेदवार जेडीएस नेते डी कुपेंद्र रेड्डी यांचा अवघ्या 36 मतांनी पराभव झाला.
हिमाचल प्रदेशमध्ये काय झालं?
हिमाचल प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर, येथे भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव करत विजय मिळवला. येथे 34-34 मतांवर काँग्रेसशी बरोबरी झाल्यानंतर भाजपचे उमेदवार लकी ड्रॉद्वारे विजयी झाले.
उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांवर निवडणूक झाली. येथे भाजपला आठ तर समाजवादी पक्षाला दोन जागा जिंकता आल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपाचे सात आमदार राकेश पांडे, अभय सिंह, राकेश प्रताप सिंह, मनोज पांडे, विनोद चतुर्वेदी, पूजा पाल, आशुतोष मौर्य यांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले. याशिवाय बसपाच्या एका आमदारानेही भाजपला क्रॉस व्होट केले.
राज्यसभेच्या एकूण 56 जागांवर निवडणूक होती. त्यापैकी 41 जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत.
मतदानापासून निकालापर्यंत दिवसभरात काय घडले?
उत्तर प्रदेशात भाजपने राज्यसभेच्या आठ जागा जिंकल्या तर सपाला दोन जागा जिंकता आल्या. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, माजी खासदार चौधरी तेजवीर सिंग, उत्तर प्रदेश भाजपचे सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी राज्यमंत्री संगीता बलवंत, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, माजी खासदार साधना सिंह, आग्राचे माजी महापौर नवीन जैन आणि उद्योगपती संजय सेठ यांचा समावेश आहे.
कर्नाटकात काय झाले?
कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अजय माकण, नासिर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर हे तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपचे नारायण भांडगे यांना एका जागेवर विजय मिळवता आला. त्याचवेळी जेडीएस नेते डी कुपेंद्र रेड्डी यांचा अवघ्या 36 मतांनी पराभव झाला.
हेही वाचा >> 'शिंदे-फडवणवीसांचे आरोप पोरकट', जरांगेंवरील 'त्या' आरोपांवर शरद पवारांचे उत्तर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील भाजपच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. भाजपचे एसटी सोमशेकर आणि अपक्ष आमदार जी जनार्दन रेड्डी यांनी काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याचे बोलले जात आहे.
सिंघवी पराभूत
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव करत विजय मिळवला.
राज्यसभा निवडणुकीत जया बच्चन आणि समाजवादी पक्षाचे दलित नेते रामजी लाल सुमन विजयी झाले. जया बच्चन यांना सर्वाधिक ४१ मते मिळाली. याआधी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची बातमी आली होती.
सुक्खू सरकार धोक्यात?
भाजपने हिमाचल प्रदेश विधानसभेत विश्वास मत चाचणीची मागणी केली आहे. त्यावर उत्तर देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी अर्थसंकल्पावर उद्या चर्चा करू, असे सांगितले. यानंतर आम्ही परिस्थिती पाहणार आहोत. मात्र काँग्रेस सरकारने बहुमत गमावले आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिंदर सिंग सुक्खू यांच्यासोबत पत्रकार परिषदेदरम्यान अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजप उमेदवाराचे अभिनंदन करताना काँग्रेसच्या नऊ आमदारांनी क्रॉस व्होट केल्याची पुष्टी केली. दरम्यान, हरियाणा पोलिसांनी काँग्रेसच्या ५ ते ६ आमदारांना पंचकुलाला नेल्याचे मुख्यमंत्री सुक्खू यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा >> 'जरांगेंना मारण्याचा कट'; उद्धव ठाकरे म्हणाले, 'त्याची...'
राज्यसभेच्या एकूण 56 जागांवर निवडणूक होणार होती, परंतु त्यापैकी 41 जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. जेपी नड्डा यांनी यापूर्वीच गुजरातची राज्यसभेची जागा बिनविरोध जिंकली आहे. तसेच अश्विनी वैष्णव यांनी बिजू जनता दलाच्या पाठिंब्याने ओडिशाच्या राज्यसभेच्या जागेवरून विजय मिळवला आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री एल मुरुगन हे देखील मध्य प्रदेशातून बिनविरोध विजयी झाले आहेत.
त्याच वेळी, सोनिया गांधी राजस्थानच्या राज्यसभेच्या जागेवर बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजपचे चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड हेही बिनविरोध विजयी झाले आहेत. गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया, जसवंत सिंग परमार आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख मयंक नायक हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. बिहारमधील जेडीयू नेते संजय झा यांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
15 पैकी कोणाला किती जागा मिळाल्या?
भाजप - 10 उमेदवार रिंगणात होते आणि सगळे जिंकले. सुधांशू त्रिवेदी, आरपीएन सिंग, अमरपाल मौर्य, तेजपाल सिंग, नवीन जैन, साधना सिंग, संगीता बलवंत आणि संजय सेठ हे उत्तर प्रदेशचे आहेत. हिमाचलमध्ये हर्ष महाजन विजयी झाले. आणि कर्नाटकातून नारायण सा भांडगे विजयी झाले आहेत.
समाजवादी पार्टी - उत्तर प्रदेशमधून एकूण 3 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी 2 विजयी झाले. जया बच्चन यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांच्याशिवाय रामजी लाल सुमन हेही विजयी झाले. आलोक रंजन हरले.
काँग्रेस - कर्नाटक आणि हिमाचलमध्ये एकूण 4 उमेदवार उभे केले. तीनही जिंकले. तिन्ही जागा कर्नाटकातून आल्या आहेत. अजय माकन, सय्यद नासिर हुसेन आणि जीसी चंद्रशेखर कर्नाटकमधून राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
ADVERTISEMENT