Rajya Sabha Election 2024,Maya Naroliya : 'मी किचनमध्ये चपात्या लाटत होते आणि अचानक मला एक फोन आला आणि मला थेट राज्यसभेची (Rajya ) उमेदवारी मिळाली, अशी माहिती भाजपच्या (BJP) मध्यप्रदेशच्या राज्यसभेच्या उमेदवार माया नरोलिया (Maya Naroliya) यांनी सांगितले. तसेच पक्षातून इतकी मोठी जबाबदारी मिळेल याची मला अपेक्षा देखील नव्हती अशा भावना देखील माया नरोलिया यांनी व्यक्त केल्या आहेत. .राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर माया नरोलिया या चर्चेत आल्या आहेत. (rajya sabha election 2024 maya narolia bjp madhya pradesh candidate receive call from delhi whle rolling chapattis in the kitchen politics)
ADVERTISEMENT
येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणूसाठी मध्यप्रदेशमध्ये भाजपने त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.यामध्ये एक नाव हे नर्मदापूरमच्या माया नरोलिया यांचे देखील आहे. माया नरोलिया या मध्य प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत, आता त्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे.
दरम्यान भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माया नरोलिया यांनी एमपी तकशी बातचित केली आहे. यावेळी बोलतााना माया नरोलिया म्हणाल्या की, 'मी घरीच होते आणि जेवण बनवत होते. यावेळी किचनमध्ये चपात्या लाटत असताना माझा मुलगा धावत घरी आला आणि त्याने माझे नाव राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत असल्याची माहिती दिली होती. टीव्हीवर देखील बातम्या झळकत होत्या आणि मला अनेकांचे फोन देखील आले, असे, माया नरोलिया यांनी सांगितले.
मला विश्वासच बसत नव्हता. कारण मला या गोष्टीची काही एक कल्पना नव्हती. माझ्यावर पक्ष इतकी मोठी जबाबदारी देणार आहे. कारण मला पक्षाने महिला प्रदेशाध्यक्ष बनवले होते. आणि त्यामध्ये मी खूश होते, असे माया नरोलिया यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT