Shiv Sena Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्रात उद्या (5 डिसेंबर) नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. पण या सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी गृहमंत्री पद त्यांना हवं आहे. ज्यासाठी ते अडून बसले आहेत. मात्र, याशिवाय शिवसेनेचे कोणते मंत्री शपथ घेऊ शकतात याबाबतही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (will eknath shinde become the deputy chief minister or not but who will get the ministerial post see the list of probable shiv sena ministers)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी 2022 पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. यापैकी बऱ्याच आमदारांना त्यांनी मंत्रिपदाची संधी दिली. तसंच काही जणांनी चांगली खातीही दिली होती. पण आता 2024 साली भाजपचं सरकार आल्यामुळे शिंदेंना नमतं घ्यावं लागत आहे.
हे ही वाचा>> BJP Ministers: 'ही' आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, फडणवीस मुख्यमंत्री हे ठरलं, पण मंत्री कोण-कोण?
अशावेळी आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून नेमकं कोणाला मंत्रिपद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच शिंदे ज्या नावांची यादी भाजपकडे पाठवतील त्यांना भाजपकडून मान्यता मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, शिवसेनेचे संभाव्य मंत्री नेमकं कोण-कोण असू शकतात यावर टाकूया एक नजर...
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
- एकनाथ शिंदे
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उदय सामंत
- तानाजी सामंत
- अब्दुल सत्तार
- दीपक केसरकर
- शंभुराज देसाई
- भरतशेट गोगावले
- अर्जुन खोतकर
- संजय शिरसाट
- विजय शिवतारे
- योगेश कदम
हे ही वाचा>> मोठी बातमी! फडणवीस भेटले पण शिंदे 'अजूनही' अडून बसले, आता थेट शाहांना...
शिवसेनेतील या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतं. पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावर अंतिम निर्णय असणार आहे. मात्र, या नावांमध्ये फारसा बदल शिंदेकडून केला जाणार नसल्याचं सध्या तरी बोललं जातंय. पण आता या नावांना भाजपकडून देखील हिरवा कंदील मिळणं गरजेचं आहे. तरच या नेत्यांचा शपथविधी पार पडू शकतो.
ADVERTISEMENT