NCP Ajit Pawar: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या (5 डिसेंबर) पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीस सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून आझाद मैदानावर शपथ घेतली. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीबाबत संभ्रम कायम असताना दुसरीकडे अजित पवार मात्र यांनी उघडपणे आपण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं सांगून मोकळे झाले आहेत. मात्र, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणते मंत्री शपथ घेऊ शकतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. (will ajit pawar become the deputy chief minister who will get the ministerial post see the list of probable ncp ministers)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील सर्वाधिक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाणार आहे. मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना आताही याच पदावर समाधान मानावं लागणार आहे.
40 आमदार घेऊन बाहेर पडलेल्या अजितदादांना यंदाच्या विधानसभेत भरघोस यश मिळालं आहे. त्यामुळे भाजपसोबत उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत राहणचं त्यांनी पसंत केलं आहे.
हे ही वाचा>> BJP Ministers: 'ही' आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, फडणवीस मुख्यमंत्री हे ठरलं, पण मंत्री कोण-कोण?
पण यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या नेत्याला मंत्रिपद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच अजित पवार ज्या नावांची यादी भाजपकडे पाठवतील त्यांना भाजपने मान्यता देणंही गरजेचं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री नेमकं कोण-कोण असू शकतात यावर टाकूया एक नजर...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
- राजकुमार बडोले
- माणिकराव कोकाटे
- दत्तात्रय भरणे
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे-पाटील
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- धर्मरावबाबा आत्राम
- आदिती तटकरे
- अनिल पाटील
हे ही वाचा>> Shiv Sena Ministers: शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, पण एकनाथ शिंदेंचं काय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतं. पण याशिवाय काही इतर नावांचाही अजित पवार किंवा त्यांच्या पक्षाकडून समावेश केला जाऊ शकतो. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत अनेक ज्येष्ठ नेते आहेत. ज्यांना मंत्रिपद देणं हे अजित पवारांना क्रमप्राप्त आहे. अशावेळी अजित पवार हे इतर नव्या नावांचा समावेश करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT