Barsu Refinery : ‘आधी बोंबाबोंब, अन् नंतर…’, उद्योगमंत्री उदय सामंत ठाकरेंवर चिडले

मुंबई तक

25 Apr 2023 (अपडेटेड: 25 Apr 2023, 08:27 AM)

Uday samant criticize Uddhav Thackeray group :इकडे प्रकल्प गेले म्हणून बोंबोबोंब करायची, आणि प्रकल्प येत असताना कुठच्या तरी उद्देशापोटी त्यामध्ये खोडा घालायचा. ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर आली असल्याची टीका सामंत यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.

Uday samant criticize Uddhav Thackeray group

Uday samant criticize Uddhav Thackeray group

follow google news

Uday samant criticize Uddhav Thackeray group : बारसू सोलगावमध्ये रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरु झाले आहे.या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांनी ठिय्या आंदोलन सूरू केले आहे. आज यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तसेच माध्यम प्रतिनिधींना देखील वृतांकन रोखण्यात आले होते. या सर्व प्रकारावर आता राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday samant) यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे. इकडे प्रकल्प गेले म्हणून बोंबोबोंब करायची, आणि प्रकल्प येत असताना कुठच्या तरी उद्देशापोटी त्यामध्ये खोडा घालायचा. ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर आली असल्याची टीका सामंत यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. (ratnagiri barsu refinery uday samant criticize thackeray group)

हे वाचलं का?

बारसू सोलगावमध्ये मोठं आंदोलन होईल अशी अपेक्षा काही जणांना होती, फार मोठा उद्रेक होईल असे वाटले होते, मात्र त्यांचे मनसूबे धुळीला मिळाले असल्याचे टीका देखील सामंत (Uday samant) यांनी केली आहे. तसेच आंदोलकांवर दडपशाही करणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रशासन आंदोलकांवर समन्वय साधून असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या सुट्टीवर? अचानक सुट्टीमागचं कारण काय?

नाणार रिफायनरी जी रद्द झाली, होती ती रद्द होण्यात आम्ही देखील होतो.कारण तिथल्या लोकांचा 100 टक्के विरोध होता. परंतू बारसूमध्ये रिफायनऱी करावी यासाठी केंद्राला पत्र एकनाथ शिंदे यांनी लिहले नसून उद्धव ठाकरेंनी लिहले असल्याची माहिती सामंत यांनी दिली. यासोबतच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)समर्थन देणाऱ्या तिथल्या आमदारांचे देखील रिफायनरी झाली पाहिजे अशीच भूमिका आहे. पण मुंबईमध्ये बसून 9.30 चा इवेंट करणारे खासदार (संजय राऊत) म्हणतात, ‘रिफायनरी व्हायला नाही पाहिजे’.त्यामुळ एकीकडे प्रकल्प गेले म्हणून बोंबोबोंब करायची, आणि प्रकल्प येत असताना कुठच्या तरी उद्देशापोटी त्यामध्ये खोडा घालायचा. ही दुटप्पी भूमिका जनतेसमोर आली असल्याची टीका सामंत यांनी ठाकरे गटावर केली आहे.

रिफायनरी विरूद्ध आंदोलन करणाऱ्या 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासोबतच
माध्यम प्रतिनिधीला हाकलण्यात आल्याचे गैरसमज आहेत, सगळ्यांच्या बाबतीत हे घडले नाही आहे, एकाच व्यक्तीबाबत किंवा कॅमेरामनबाबत ही घटना घडलीय. याची चौकशीच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार,मग पाटावर कोण बसणार? ठाकरे गटाची शिंदेंवर टीका

अजित पवार काय म्हणाले?

बारसू रिफायनरी प्रकल्पावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करून आपली भूमिका मांडलीय. रिफायनरीचे सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा, असे अजित पवार म्हणाले आहेत. यासोबतच पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी देखील सरकारला विनंती केली आहे. तसेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी,असे आवाहन पवार यांनी सरकारला केले आहे.

    follow whatsapp