Barsu Refinery : ‘दिल्लीतील सैतान आदेश देतायेत, उद्या हॅन्डग्रेनेडही फेकतील..’,बारसूवरून राऊत आक्रमक

मुंबई तक

28 Apr 2023 (अपडेटेड: 28 Apr 2023, 11:40 AM)

कोकणात जो अमानुष खेळ सुरु आहे, तो दिल्लीतून मोघलांच्या आदेशाने सुरू आहे. इतक्या अमानुषपणे आंदोलकांवर हल्ले केले जातायत. उद्या गोळ्या झाडाल, हॅन्डग्रेनेट फेकाल, बारसूची भूमी रक्ताने भिजवाल आणि त्यावर तुमची रिफायनरी उभी कराल,असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

Sanjay Raut aggressive from Barsu refinery

Sanjay Raut aggressive from Barsu refinery

follow google news

Sanjay Raut on Barsu Refinery protesters : रत्नागिरीच्या राजापूरमध्ये प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कोकणात वातावरण चांगलेच तापले आहे.आज दुपारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान झटापट झाली होती. आंदोलकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर देखील करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ तणावपुर्ण परिस्थिती तयार होऊन मोठा संघर्ष पेटला होता. आता या सर्व प्रकारावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलकावर उद्या गोळ्या झाडतील, हॅन्डग्रेनेट फेकतील, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यासोबतच बारसू रिफायनरीच्या आजूबाजूच्या जमीनींची माहिती जाहिर करावी, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना केले आहे. (sanjay raut criticize government barsu Refinery Project tomorrow they will shoot bullets throw hand grenades)

हे वाचलं का?

एकाबाजूला तुम्ही म्हणता चर्चेतुन मार्ग काढू आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आदोलकांना गुरांसारखी मारहाण करताय. कोकणात जो अमानुष खेळ सुरु आहे, तो दिल्लीतून मोघलांच्या आदेशाने सुरू आहे. इतक्या अमानुषपणे आंदोलकांवर हल्ले केले जातायत. उद्या गोळ्या झाडाल, हॅन्डग्रेनेट फेकाल, बारसूची भूमी रक्ताने भिजवाल आणि त्यावर तुमची रिफायनरी उभी कराल,असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

हे ही वाचा : बारसूच्या राड्यावर मुख्यमंत्री म्हणाले.. हे तर सर्वसामान्यांचं सरकार… अन्याय करणार नाही!

बारसूच्या आजूबाजूला जमीन खरेदी मोठ्या प्रमाणावर खाजगी लोकांनी केली आहे. मिस्टर उदय सामंत…जमीनी कोणाच्या आहेत ते सांगा?, प्रॉपर्टी कोणी घेतल्या ते जाहिर करा, असे थेट आव्हान राऊत यांनी उदय सामंत यांना केले आहे.

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

फक्त या विषयावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलायला तयार नाही. महाराष्ट्राला मोघलाईचे आदेश देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते मॉरिशियसला गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली. पुतळ्यांचा अनावरण करण्याचा अधिकार आहे का यांना? शिवरायांच्या महाराष्ट्रात निरपराध लोकांना गुरांसारख तुडवल जातेय. त्याचा आवाज दडपला जातोय. महिलांना फरफटत, केस ओढत नेले जातेय,असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : बारसूमध्ये तुफान राडा, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट; रिफायनरीचा प्रश्न चिघळला

विनायक राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

ठाकरे गटाने स्थानिकांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे बारसू येथे आंदोलकांची भेट घेण्यासाठी निघालेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. गेल्या अनेक तासांपासून राऊत आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    follow whatsapp