महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या श्री सदस्यांपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. श्री सदस्यांच्या मृत्यूचं कारण उष्माघात सांगण्यात आलं आहे. या घटनेवरून राजकारण तापलेलं असताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर करत हे मृतकेलेल्या विधानामुळे या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे.
ADVERTISEMENT
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर काहींना अत्यवस्थ वाटतं असल्यानं रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यातील मृतांचा आकडा वाढत आहे. एकीकडे मृतांचा आकडा वाढत असताना काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ याच कार्यक्रमातील असल्याचा दावा आता खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
संजय राऊतांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “खारघर… सरकारी अव्यवस्था आणि राजकीय मनमानीचे निर्घृण बळी… श्री सेवक चेंगरून मरण पावले. सरकारने मृतांचा खरा आकडा आजही लपवला आहे? मृतांचा आकडा आता 15 झालाय. देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागा. आणखी किती पापं लपविणार आहात?”, असा घणाघात राऊतांनी केला.
“मुख्यमंत्र्यांचा पोलीस आणि प्रशासनावर दबाब होता की,…”, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत माध्यमांशी बोलताना असं म्हणालेले की, “ज्या पद्धतीचे व्हिडीओ आता समोर येत आहेत. सुरूवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लवपत आहेत आणि त्यांचा पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे की, खरा आकडा सांगू नका. ज्यादिवशी दुर्घटना घडली, त्यादिवशी 14 लोकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा 20 च्या वर आहे, असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते.”
“एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व त्यांच्या इतर सगळ्या यंत्रणांना आदेश होते की, सहा किंवा सात लोक मरण पावले हेच सांगायचे. पण, ज्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडल्या, मृत्यू झाले. ते आकडे आता हळूहळू समोर यायला लागले आहेत. हा आकडा आज 14 पर्यंत गेला आहे. पण, तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडीओ समोर आले. ज्यात चेंगराचेंगरी दिसतेय, त्याच्यानुसार हा आकडा 20 च्या वर गेला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा >> जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला चेंगराचेंगरीचा व्हिडीओ, म्हणाले…
“उष्माघात हे फक्त कारण नाही. तिथला ढिसाळ कारभार. लोकांना प्यायला पाणी नव्हतं. टँकरने पाणी पुरवलं जात होतं. उन होतेच आणि नंतर जी चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे हे मृत्यू झाले. त्याला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही, हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं. दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री असता, तर भाजपने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती”, असंही राऊतांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
