Santosh Deshmukh Wife: योगेश काशिद, बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी नेमकं काय घडलं याबाबत आता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी पोलिसात आपला जबाब नोंदवला आहे. ज्यामध्ये त्यांनी मोठं विधान केलं आहे. (santosh deshmukh wife ashwini deshmukh police statement is as it is serious allegations against walmik karad)
ADVERTISEMENT
संतोष देशमुखांच्या पत्नीचा पोलीस जबाब जसाच्या तसा...
'माझे पती संतोष देशमुख यांनी मला सांगितले होते दिनांक 6 डिसेंबरनंतर वाल्मिक कराड यांनी सांगवी सारणी या गावचे सरपंच संजय केदार यांना फोनवरून सांगितले होते की, संतोष देशमुख याला निरोप द्या आणि तू यात पडू नको. असे सांगा.. असंही मला माझे पती संतोष देशमुख यांनी सांगितले होते. आणि मला वाल्मिक कराडपासून धोका आहे.'
हे ही वाचा>> Dhananjay Deshmukh : जरांगेंचा फोन, पोलिसांचं आश्वासन... धनंजय देशमुख खाली उतरायला तयार
'त्याच्यानंतर दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी माझे पती संतोष देशमुख हे कामानिमित्त केजला गेले होते. त्यावेळी ते केजवरून शिवराज देशमुख यांच्यासोबत इंडिका कारने मस्साजोगला येत होते. त्यावेळी माझे मयत पती संतोष देशमुख यांचे अपहरण केल्याची बातमी माझे दीर धनंजय देशमुख यांनी मला सांगितली होती. त्यावेळी माझ्या दिराने विष्णू चाटे यास फोन लावला होता. त्यावेळी त्यांनी माझे दीर धनंजय देशमुख यांना सांगितले होते की, काही वेळात तुमच्या भावास आणून देतो.'
'परंतु माझे दीर धनंजय देशमुख हे केज पोलीस ठाण्यात गेले असता त्यावेळी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून मला समजले की माझी पती संतोष देशमुख यांचे आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, विष्णू साठे यांनी कट करून अपहरण करून त्यांचा खून केलेला आहे.' असा जबाब अश्विनी देशमुख यांनी पोलिसात नोंदवला आहे.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटले आहे की, माझे मयत पती सरपंच देशमुख यांना वाल्मिक कराड यांच्याकडून सांगवी सारणी या गावचे संजय केदार यांच्याकडून धमकी देण्यात आली होती.
यामुळे आता या जबाबानंतर वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
