Sharad Pawar : "CM फडणवीसांनी मारकडवाडीत यावं आणि..." काय म्हणाले शरद पवार?

सुधीर काकडे

08 Dec 2024 (अपडेटेड: 08 Dec 2024, 11:47 AM)

शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज या गावात उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. 

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार मारकडवाडीत...

point

EVM बंद करण्याची मागणी

point

CM फडणवीस यांना काय आवाहन केलं?

Sharad Pawar Markadwadi Speech : अमेरिका, इंग्लंडसह युरोपमधील सगळे देश बॅलेट पेपरवर मतदान घेतात. अनेक देशांनी सुरू असलेलं EVM  बंद केलं.  त्यामुळे इथल्याही सर्व अडचणींवर एकच पर्याय असून, निवडणूक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली. माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी या गावामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर बॅलेटवर मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रशासनाने ही निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे या गावात काही काळ संघर्ष निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यभर या गावाचं नाव पोहोचलं, विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरला आणि विधानसभा अधिवेशनात या मुद्दयाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ न घेत या प्रकरणी निषेध नोंदवला आहे. त्यानंतर आज शरद पवार, जयंत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आज या गावात उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा >>CM Devendra Fadnavis : "...म्हणून सर्वात जास्त मराठा आमदार भाजपमधून झाले", फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

 

तुम्ही गावातले लोक इथे मॉक पोल घेणार होतात. पण पोलिसांनी बंदी घातली, असा कोणता कायदा आहे? असा सवाल शरद पवार यांनी केला. उद्या ते म्हणतील तुम्ही ऐकायचं नाही आणि मी बोलायचं नाही... असा कोणता कायदा आहे तुमच्याच गावात तुम्हाला जमावबंदी कशी लागू होऊ शकते? असे सवाल करत प्रशासनावर निशाणा साधला. तसंच त्यांनी आवाहन केलं की, तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये ठराव करा. आम्हाला EVM ने मतदान नको, तो ठराव आम्हाला द्या, द्या आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवू. 

 

हे ही वाचा >> Uttamrao Jankar Markadwadi : मी आमदारकीचा राजीनामा देतो, फक्त एकच अट... पवारांसमोर मारकडवाडीत जानकरांचा एल्गार

शरद पवार यांनी पुढे बोलताना फडणवीसांवरही निशाणा साधला. काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. ते म्हणाले पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चूक? तुमच्या गावी येणं चुकीचं आहे? असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसंच पुढे ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, इथे राजकारण आणायचं नाही, आम्हाला लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन करायचं आहे असं पवार म्हणाले.  मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, की तुम्ही स्वत: या गावात या, लोकांना भेटा, त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल, तर त्यांना सहकार्य करा.  पुढे बोलताना शरद पवार यांनी जानकर यांचं कौतुक करत काही मिश्किल टोलेही मारले. गेले काही दिवस, जानकरांना झोप नाही, ते हाच मुद्दा मांडतात, मला माहिती नाही ते रात्री झोपेत काय बोलतात... असं शरद पवार म्हणाले.


 

    follow whatsapp