Sharad Pawar: "बदलापूरची घटना राज्य सरकारचं..."; शरद पवार नेमकं काय म्हणाले? 

मुंबई तक

23 Aug 2024 (अपडेटेड: 23 Aug 2024, 02:18 PM)

Sharad Pawar On Badlapur Case :बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्टला बंदची हाक दिली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी या घटनेबाबत मोठं विधान केलं आहे.

Sharad Pawar Press Conference

Sharad Pawar Press Conference

follow google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरच्या घटनेबाबत शरद पवारांचं मोठं विधान

point

शरद पवारांनी राज्य सरकारवर केली टीका

point

पत्रकार परिषदेत शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar On Badlapur Case :बदलापूरच्या एका नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्टला बंदची हाक दिली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी या घटनेबाबत मोठं विधान केलं आहे. "शैक्षणिक संस्थेत अशा घटना घडतात, हे धक्कादायक आहे. महिलांवर, बालिकांवर, मुलींवरील अत्याचारचं चित्र दुर्दैवाने वाढत आहे, असं पाहायला मिळत आहे. या प्रकरणांबाबत लोकांमध्ये उद्रेकाची भावना आहे. पण त्यांनी संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद पाळावा", असं पवार म्हणाले.(Badlapur incident has created a clash between the ruling party and the opposition. Against this backdrop, the Mahavikas Aghadi has called for a bandh tomorrow on August 24. Similarly, Sharad Pawar, the leader of NCP, has made a big statement regarding this incident.)
 

हे वाचलं का?

शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले? 

बदलापूरच्या घटनेच्या आधी देशातील विविध राज्यांमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी घडल्या. शैक्षणिक संस्थेत अशा घटना घडतात, हे धक्कादायक आहे. महिलांवर, बालिकांवर, मुलींवरील अत्याचारचं चित्र दुर्दैवाने वाढत आहे, असं पाहायला मिळत आहे. या प्रकरणांबाबत लोकांमध्ये उद्रेकाची भावना आहे. पण त्यांनी संघर्षाची भूमिका घेण्याऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी. या हेतुनं उद्याचा बंदचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : मविआने महाराष्ट्र बंदची हाक का दिली? किती वाजेपर्यंत पाळायचा बंद?

बदलापूरची घटना राज्य सरकारचं अपयश

माझ्या पक्षाचे सर्व सहकारी सहभागी होतीलच. पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेल्या महाराष्ट्रातला प्रत्येक घटक यामध्ये सहभागी व्हावा. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा. हे लाजीरवाणे प्रकार घडत आहेत, त्याबद्दल तीव्र भावना या बंदच्या माध्यमातून महाराष्ट्रात व्यक्त व्हाव्यात. हा त्याचा हेतू आहे. बदलापूरची घटना राज्य सरकारचं अपयश आहे. या घटनांसारखे प्रश्न थांबत नाहीत. ते वाढत असल्याचं चित्र दिसतंय. त्यासाठी समाजाच्या राजकारणला जागृत करण्याची गरज आहे. शासनाची काय सुव्यवस्था यंत्रणेलाही जागृत करावं लागेल.

मी कुणालाही दोष देत नाही. पण हे थांबण्यासाठी जे जे करावं लागेल. ते एका शांततेच्या चौकटीत राहून करावं, अशी काळजी घ्यावी. बदलापूरमध्ये आंदोलकांनी केलेल्या रेलरोकोबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, आंदोलन राजकीय होतं, असं बोलणं योग्य ठरणार नाही. या घटनेवर लोकांची रिअॅक्शन आली. त्यामुळे लोक एकत्र आले होते. लोकांनी आपल्या भावना त्याठिकाणी शांततेनं व्यक्त केल्या. असं असताना त्यांच्यावर खटले दाखल करणे योग्य नाह, असंही पवार म्हणाले.

    follow whatsapp