Shiv sena vs BJP: शिंदेंच्या आमदाराने वाटले मुस्लिम महिलांना बुरखे, महायुतीत गदारोळ

ऋत्विक भालेकर

12 Sep 2024 (अपडेटेड: 12 Sep 2024, 10:23 PM)

Yamini Jadhav burkha: मुंबईतील शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी आपल्या भागातील मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केल्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून बुरख्याचे वाटप

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून बुरख्याचे वाटप

follow google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून बुरख्याचे वाटप

point

भायखळ्यात लागलेले पोस्टर व्हायरल झाल्यानंतर महायुतीत गदारोळ

point

भाजपने बुरखा वाटपावर घेतला आक्षेप

Yamini Jadhav distributed Burqas: मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारानेही त्यांच्या भागातील मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप केले. पण भायखळा येथे लावलेले बॅनर्स आणि पोस्टर्स व्हायरल झाल्यानंतर महायुतीत एकच गदारोळ झाला आहे. (shinde shivsena mla distributed burqas after the poster went viral there was a ruckus in mahayuti)

हे वाचलं का?

भायखळा येथे लावलेल्या या बॅनरमध्ये विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच मुस्लिम महिलांना बुरख्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे. हे बॅनर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी लावले होते. याबाबत विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर धर्मावर आधारित संधिसाधू राजकारण करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

हे ही वाचा>> Exculsive: 'फडणवीस, बावनकुळेंसाठी 'हा' इशारा पुरेसा', किरीट सोमय्या एवढं थेट बोलले अन्...

दरम्यान, यामिनी जाधव यांच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमावर भाजपने मात्र जोरदार आक्षेप घेतला आहे. बुरखा वाटपावर भाजप सहमत नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलारांनी दिली.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

'आम्हाला हे मान्य नाही. मला या विषयी पूर्ण माहिती नाही तरीपण अशा पद्धतीच्या बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाशी भाजप सहमत नाही. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं हे मान्य नाही', अशी प्रतिक्रिया देत आशिष शेलार यांनी महायुतीतील शिवसेनेवर एक प्रकारे टीका केली आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Survey : ठाकरेंना बसणार जबर झटका, विधानसभेत शिंदेंचं काय होणार? खळबळजनक सर्व्हे

लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव झालेल्या पराभूत

विशेष म्हणजे मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (UBT)चे अरविंद सावंत विजयी झाले. या निवडणुकीत त्यांना भायखळा परिसरातून मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक मते मिळाली आहेत.

शिंदे गटाच्या बाजूने भायखळ्याच्या आमदार यामिनी जशवंत जाधव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या, आधी त्या ठाकरेंच्या शिवसेनेत होत्या. पण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं तेव्हा त्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला होता. यामिनी जाधव केवळ लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नाहीत, तर त्यांना त्यांच्या मतदारसंघातही अत्यंत कमी मतं मिळाली. त्यामुळे अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा तब्बल 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

2019 मध्ये भायखळ्यातून निवडणूक जिंकली

2019 च्या विधानसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून 41.98 टक्के मते मिळाली होती. त्यांना 51,180 मते मिळालेली तर काँग्रेसचे उमेदवार अण्णा चव्हाण यांना 24,139 मते मिळाली होती. आता निवडणुका जवळ आल्या आहेत. या कारणास्तव मुस्लिम व्होट बँक टॅप करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

    follow whatsapp