Kalaben Delkar: उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का.. ‘हा’ विश्वासू खासदार थेट भाजपमध्ये?

रोहित गोळे

• 09:07 AM • 23 Dec 2023

Kalaben Delkar Meets PM Modi: दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण त्या भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.

shiv sena thackeray group mp kalaben delkar is likely to join the bjp before lok sabha 2024 elections big blow to uddhav thackeray

shiv sena thackeray group mp kalaben delkar is likely to join the bjp before lok sabha 2024 elections big blow to uddhav thackeray

follow google news

Kalaben Delkar BJP: मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (UBT) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ज्यांच्या खासदारकीसाठी स्वत: उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पंगा घेतला होता. त्याच खासदार आता भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. दादरा-नगर हवेलीतील शिवसेना (UBT) खासदार कलाबेन डेलकर यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. (shiv sena thackeray group mp kalaben delkar is likely to join the bjp before lok sabha 2024 elections big blow to uddhav thackeray)

हे वाचलं का?

कलाबेन मोहन डेलकर या सात वेळचे खासदार असलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. याच कलाबेन डेलकर यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याबाबत कलाबेन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी ही भेट ‘अर्थपूर्ण’ झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता डेलकर कुटुंबीय पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधानांसोबतची भेट ‘अर्थपूर्ण’

दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन मोहन डेलकर यांच्यासह त्यांचा मुलगा अभिनव मोहन डेलकर आणि मुलगी दिविता मोहन डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली.

या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदार कलाबेन मोहन डेलकर यांनी दादरा नगर हवेलीच्या जनहिताच्या प्रश्नांची माहिती पंतप्रधानांना दिली.

पंतप्रधानांनी त्यांच्या व्यस्त वेळेत भेटण्यासाठी वेळ दिला आणि राज्यातील सर्व जनहिताच्या प्रश्नांवर मोठ्या आस्थेने चर्चा केली.

या चर्चेदरम्यान समोर आलेल्या सर्व मुद्द्यांची पंतप्रधानांनी अत्यंत गंभीर दखल घेतली आणि दादरा नगर हवेलीच्या सर्व विकासाच्या प्रश्नांवर आणि राज्यातील जनतेसोबत आपण सजग असल्याची ग्वाही दिली.

होय… पंतप्रधान आणि खासदारांमधील ही अर्थपूर्ण बैठक राज्याच्या हिताच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. असं म्हणत अभिनव डेलकर यांनी पंतप्रधान मोदींसोबतचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

मोहन डेलकरांनी मुंबईत केलेली आत्महत्या

मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील सी ग्रीन या हॉटेलमध्ये गळाफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर मोहन डेलकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार राडा झाला होता. कारण मोहन डेलकर यांनी दीव-दमणचे प्रशासकावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. ज्यावरुन शिवसेनेने याच मुद्द्यावरून भाजपवर तुफान टीका केली होती.

हे ही वाचा>> राज ठाकरेंच्या मुलीला सोशल मीडियावर कोण देतंय त्रास?, शर्मिला ठाकरे तर संतापल्याच!

दरम्यान, मोहन डेलकर यांच्या निधनामुळे तेथील खासदारकीची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे जेव्हा या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने (उद्धव गट) तिकीट दिलं होतं. त्या निवडणूक कलाबेन यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला होता.

डेलकर कुटुंबीय भाजपमध्ये परतणार?

दरम्यान, 2022 साली शिवसेनेत फूट पडली तरी कलाबेन डेलकर यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच राहणं पसंत केलं होतं. मात्र, आता लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने असतानाच डेलकर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर डेलकर कुटुंबीय हे 2024 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये परतणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दादरा नगर हवेलीचे लोकसभेत प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे मोहन डेलकर हेही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भाजपमध्ये होते आणि लोकसभेत पोहोचले होते.

हे ही वाचा>> Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत..’, जरांगेची भुजबळांवर जहरी टीका

2014 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भाजपचा विजय झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

मोहन डेलकर यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीने शिवसेनेकडून निवडणूक लढवून भाजपच्या महेश गावित यांचा 51,269 मतांनी पराभव केला होता. पण आता कलाबेन डेलकर यांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट झाली आहे. गेल्या महिन्यात भाजपने गुजरातचे मोठे नेते पूर्णेश मोदी यांना दादरा नगर हवेलीचे प्रभारी बनवले होते. अशा स्थितीत कलाबेन डेलकर यांच्या पंतप्रधान भेटीमुळे नवे राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp