Satyapal Malik on Uddhav Thackeray : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने आपली भूमिका मांडली आहे. या दाव्यानं काँग्रेस हायकमांड अस्वस्थ झाल्याची आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ममतांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. त्यातच आता माजी राज्यपाल सत्यपाल मलिका यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी आपल्या नेत्या म्हणून ममता बॅनर्जी यांचं पुढे केलं, तर ही आघाडी निश्चितच यशस्वी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. सत्यपाल मलिक यांनी ममता बॅनर्जींसोबत उद्धव ठाकरे यांनाही इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी योग्य नेतृत्व असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सत्यपाल मलिक यांच्या या विधानानं ममता बॅनर्जी यांना बळ मिळणार आहे. इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेली असतानाच, मलिक यांचं हे वक्तव्य आलं आहे. सत्यपाल मलिक यांनी ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे दोघंही आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी योग्य चेहरे असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.
हे ही वाचा >> Markadwadi: शरद पवार, मोहितेंसारखे दिग्गज ऐकत राहिले, गर्दीतून समोर आलेल्या महिलेनं मारकडवाडी गाजवली
सत्यपाल मलिक म्हणाले "आजच्या काळात इंडिया आघाडीसाठी सर्वात मजबूत नेतृत्व कोणी असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत." इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी ममता बॅनर्जी यांना त्यांच्या नेत्या म्हणून पुढे केल्यास इंडिया आघाडी निश्चितच यशस्वी होईल. तसंच बॅनर्जी आणि ठाकरे यांच्यात नेतृत्वाची क्षमता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवारही ममता बॅनर्जींच्याच बाजूने?
हे ही वाचा >> Ram Satpute : मोहितेंचा माज, जी भाषा समजेल त्या भाषेत उत्तर देऊ... आव्हान स्वीकारत काय म्हणाले सातपुते?
शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छेचं समर्थन केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ममता बॅनर्जी या सक्षम नेत्या असून, त्यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं.
राजस्थान, महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत नाराजीची लाट असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गोटातही काँग्रेसबद्दल नाराजी असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे आता येणाऱ्या काळात इंडिया आघाडीमध्ये नेतृत्व बदल केला जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
