ओमकार वाबळे, बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आता SIT ने सर्वात मोठी कारवाई सुरू केली आहे. या हत्या प्रकरणात SIT ने आरोपी वाल्मिक कराड याला मकोका (MCOCA) लावला आहे. यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी SIT ने अर्ज केला आहे.
ADVERTISEMENT
हत्येच्या गुन्ह्यात ताबा घेण्यासाठी SIT ने कोर्टाकडे अर्ज केला आहे. ज्या प्रकरणी आज (14 जानेवारी) 3 वाजता MCOCA कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आता MCOCA कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट घेतलं जाणार आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली होती पण कोर्टाने पोलीस कोठडी नाकारत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
हे ही वाचा>> Walmik Karad Mother Protest : "माझ्या लेकावर अन्याय, त्याला मुक्त करा", वाल्मिकच्या आईचं ठिय्या आंदोलन
हत्या प्रकरणात ताबा घ्या असा अर्ज सीआयडीकडून कोर्टात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एसआयटीचे अधिकारी हे मकोका कोर्टात दाखल झाले असून त्यांनी देखील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली आहे.
एसआयटीचे अधिकारी हे आज केजमध्ये दाखल झाले. काही वेळापूर्वी खंडणी प्रकरणातील सुनावणी ही पूर्ण झाली. ज्या प्रकरणी कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र, त्यानंतर संतोष देशमुख हत्ये प्रकरणी SIT ने अर्ज दाखल केला. या अर्जात हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर SIT ने वाल्मिक कराडची कोठडी मागितली आहे.
हे ही वाचा>> Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरणी CM फडणवीसांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय
आता SIT मकोका कोर्टाकडून वाल्मिक कराडचा ताबा मागणार आहे. याबाबत सविस्तर पत्र कोर्टाकडे देण्यात आले आहे..
कोर्टाला सुट्टी असल्याने आज त्याला बीड मध्यवर्ती कारागृहात घेऊन जातील. असं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे. त्यानंतर उद्या पुन्हा सत्र न्यायालयात हजर करून SIT कस्टडी घेईल. ज्यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली आहे.
'मकोका लावल्याची माहिती आम्हाला नाही', वाल्मिक कराडच्या वकिलांचा दावा
'कोर्टाकडे युक्तिवाद झाला ज्यामध्ये 10 दिवसांची कोठडी मागितली गेली. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली आणि त्याऐवजी त्यांनी न्यायालयीन कोठडी दिली आहे.'
'आतापर्यंत असं मकोकाबद्दल काही कोर्टासमोर आलेलं नाही. फक्त खंडणीच्या केसबाबत सुनावणी झाली. दुसऱ्या गुन्ह्याबाबत या कोर्टापुढे काहीही आलेलं नाही. तपासात कुठेही वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाही हे आम्ही कोर्टाला स्पष्टपणे सांगितलेलं. खंडणी प्रकरणी आणखी 10 दिवस कोठडी हवी होती. पण गुन्ह्यात कुठेही सहभाग नसल्याचं आम्ही कोर्टाला सांगितलं.'
'15 दिवस तपास झाला त्यामुळे आता पुन्हा कोठडी नको असं आम्ही कोर्टाला सांगितलं. ज्यावर कोर्टाने सीआयडीची मागणी फेटाळली. त्यामुळे आता आम्ही खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्यावर 2-3 दिवसात सुनावणी होईल. पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मागितली जाईल. मकोका लागला तर ती प्रक्रिया वेगळी आहे, कोर्ट आहे. त्या पद्धतीने इतर प्रक्रिया चालेल. आतापर्यंत असा अर्ज समोर आलेला नाही की, त्यांना मकोका लावलेला आहे. त्यासंदर्भात माहिती नाही.' अशी माहिती वाल्मिक कराडच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ADVERTISEMENT
