माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यावरील एका पुस्तकाने भारतीय राजकारणात खळबळ उडाली आहे. प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि माजी काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी “In Pranab, My Father: A Daughter Remembers” हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधींबद्दलचे किस्से लिहिले असून, प्रणब मुखर्जी पंतप्रधान का झाले नाही, याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
“सोनिया गांधी मला पंतप्रधान बनवणार नाही”
शर्मिष्ठा मुखर्जी पुस्तकात 2004 मध्ये प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान पदाबद्दलचा किस्सा सांगितला आहे. २००४ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. सोनिया गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले, पण त्यांनी माघार घेतली. पण, पंतप्रधान पदासाठी प्रणव मुखर्जी आणि डॉ. मनमोहन सिंग यांची नावे स्पर्धेत होती. त्यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जींनी सांगितलं आहे.
हेही वाचा >> ‘अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
शर्मिष्ठा मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे की, “सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी यांच्या नावांची प्रबळ दावेदार म्हणून माध्यमांत चर्चा सुरू झाली होती.” शर्मिष्ठा यांनी पुढे लिहिलंय की, बाबा कामात खूप व्यस्त होते, त्यामुळे मला त्यांना भेटताच आले नाही. पण, मी त्यांना फोनवरून बोलले. तुम्ही पंतप्रधान होणार आहात, असं मी त्यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, नाही. ती मला पंतप्रधान करणार नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान होतील. पण, त्यांनी पटकन याची घोषणा केली पाहिजे. ही अनिश्चितता देशासाठी चांगली नाही.”
शर्मिष्ठा यांनी असंही म्हटले आहे की, “बाबांनी (प्रणव मुखर्जी) पत्रकारांनाही सांगितलं होतं की, सोनिया गांधी मला पंतप्रधान करतील अशी आशा नाही. जर अपेक्षाच नाही, तर नाराजीही नाही, असं ते म्हणालेले. प्रणव मुखर्जींना पंतप्रधान पदाची महत्त्वकांक्षा होती. पण, आपण होणार नाही, हेही त्यांना माहिती होतं”, असं शर्मिष्ठांनी म्हटलेलं आहे.
“AM-PM , कळत नाही, पीएमओ”चं काम कसं करणार?
शर्मिष्ठा मुखर्जींनी राहुल गांधी आणि प्रणव मुखर्जी यांच्या एका भेटीचा प्रसंगही सांगितला आहे. पुस्तकात म्हटलेले आहे की, एकदा राहुल गांधी प्रणव मुखर्जींना भेटायला सकाळीच गेले. त्यावेळी ते मुघल गार्डनमध्ये फिरत होते. प्रणव मुखर्जींना सकाळचा वॉक आणि पुजेच्या दरम्यान व्यत्यय आणलेलं आवडायचं नाही. तरीही प्रणव मुखर्जी राहुल गांधींना भेटले. नंतर हे कळलं की भेटीची वेळ सायंकाळी होती, पण राहुल गांधींच्या कार्यालयाने त्यांना सांगितलं की बैठक सकाळी आहे. याबद्दल मी बाबांना (प्रणव मुखर्जी) विचारलं तेव्हा ते म्हणाले की, जर राहुल गांधींच्या कार्यालयाला PM ऐवजी AM चा फरक कळत नाही, ते भविष्यात पंतप्रधान कार्यालयातील काम सांभाळतील, अशी अपेक्षा कशी करता येईल?
गांधी-नेहरू कुटुंबातून असल्याचा घमंड
लोकप्रतिनिधींना दोषी ठरवल्यानंतर सदस्यत्व तत्काळ रद्द करण्यासंदर्भातील न्यायालयाच्या निकालानंतर एक अध्यादेश काढण्यात आला होता. 2013 मध्ये राहुल गांधींनी या अध्यादेशाची प्रत फाडली होती. त्याबद्दल शर्मिष्ठा मुखर्जींनी लिहिलेलं आहे. त्या म्हणतात, “या घटनेमुळे बाबा स्तब्ध झाले होते. ते (प्रणव मुखर्जी) म्हणाले होते की, त्यांना (राहुल गांधी) गांधी-नेहरू कुटुंबातील असल्याचा घमंड आहे.”
हेही वाचा >> ‘वाघाला फसवून मारलं, पण वाघीण अजून…’, गोगामेडीची पत्नी गरजली!
शर्मिष्ठा मुखर्जींनीही असंही लिहिलेलं आहे की, “बऱ्याच दिवसांनी मी बाबांना राग आलेला बघितले. त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता. त्यावेळी ते म्हणालेले की, ते (राहुल गांधी) स्वतःला काय समजतात? ते मंत्रिमंडळाचे सदस्यही नाहीत. मंत्रिमंडळाचा निर्णय सार्वजनिक ठिकाणी रद्द करणारे ते कोण आहेत?”
शर्मिष्ठा मुखर्जींनी असाही दावा केला आहे की, राहुल गांधींबद्दल प्रणव मुखर्जी असे म्हणाले होते की, राजकारणात येण्याचा निर्णय त्यांचा नाही. त्यांच्यात ती समजही नाही आणि करिश्माही नाही. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत.
राजीव गांधींनी का उघडले होते राम जन्मभूमीचे कुलूप?
शर्मिष्ठा मुखर्जींनी याबद्दलही मोठा खुलासा केला आहे. पुस्तकात म्हटले आहे की, “शाहबानो प्रकरणानंतर कायदा केल्यामुळे हिंदूंमध्ये काँग्रेसच्या प्रतिमेला तडा गेला होता. त्याला पुन्हा नीट करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी अयोध्येतील राम जन्मभूमीचे कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी प्रणव मुखर्जींनी राजीव गांधी आणि अरूण नेहरूंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.”
ADVERTISEMENT