Supriya Sule Reply Devendra Fadnavis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला होता. मराठा समाजाला आरक्षण त्यांना कधीच द्यायचं नव्हतं, त्यांना समाजा -समाजाला झुंजवत ठेवायचं होतं,असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांवर (Sharad Pawar) केला होता.याच आरोपांवर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. 10 वर्ष झाली यांचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहेत, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात,अशा शब्दात सुप्रिया ताईंनी फडणवीसांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. (supriya sule reply devendra fadnavis on criticism sharad pawar maratha reservation maharashtra politics)
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक शनिवारी नागपूरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळेंच वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल तर, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? त्याच्याही पेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असे सुप्रिया सुळेंचं त्यावेळचं व्यक्तव्य असल्याचे फडणवीसांनी सांगत त्यांच्यावर टीका केली होती.
हे ही वाचा : JSW : “ऑफिसला बोलावलं अन् बलात्कार केला”, उद्योगपती सज्जन जिंदालांवर गुन्हा दाखल
त्यांच्या (पवारांच्या) मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला, त्यावेळेसच देता आले असते. त्यांच्या मनात असतं तर वेगवेगळ निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले, त्यावेळी कोण कुठल्या यादीत आहेत, कुणी विचारतही नव्हते, तेव्हा देता आले असते. पण त्यांना कधीच द्यायचच नव्हत, त्यांना समाज-समाजाला झुंजवत ठेवायचं होतं , त्यांचे राजकारण कसे आहे, लोक झुंजत राहिली तर आपले नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.10 वर्ष झाली यांचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे, तरी त्यांना टीकेला शरद पवारच लागतात. हेडलाईनसाठी त्यांना शरद पवारच लागतात, असा टोला सुप्रिया ताई्ंनी फडणवीसांना लगावला आहे. तर फडणवीसांच्या आरोपावर आता शरद पवार काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT