Eknath Shinde: आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना दिलं 'ते' पत्र!

Eknath Shinde DCM Post: महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधीआधी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सुरुवातीला उपमुख्यमंत्री पदासाठी तयार नसलेल्या एकनाथ शिंदेंनी आता मात्र, ते पद स्वीकारण्यास आपली तयारी दर्शवली आहे.

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ (फाइल फोटो)

एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ (फाइल फोटो)

मुंबई तक

• 03:32 PM • 05 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी अखेर स्वीकारलं उपमुख्यमंत्री पद

point

अजित पवार आणि एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

point

गृहमंत्री पदाबाबत सस्पेन्स कायम

DCM Eknath Shinde: मुंबई: नव्या सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना आता एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे. मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता अखेर भाजपचं म्हणणं मानलं आहे. (the biggest news of the moment eknath shinde will take oath as deputy chief minister gave a letter to the governor)

हे वाचलं का?

नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते. त्याशिवाय आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा>> Maharashtra CM Ceremony : भाजप, शिंदे गट अन् NCP चे कोण कोण होणार मंत्री? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी

मात्र, आता शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झाले आहेत. यासंबंधीचं पत्र हे आता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आलं आहे. 

शिवसेना नेते उदय सामंत यांनी याबाबतचं पत्र हे राज्यापालांना दिलं आहे. त्यामुळे आता शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद मिळणार?

दरम्यान, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झालेले असले तरीही त्यांना गृहमंत्री पद मिळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काल देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत शिंदेंनी गृहमंत्री पद मिळालं तरच आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारू असं म्हटलं होतं.

हे ही वाचा>> '...तर शिवसेना सत्तेत सहभागी होणार नाही?', शिंदेंच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान

ज्यावर फडणवीसांनी हायकमांडशी बोलून आपल्याला कळविण्यात येईल असं शिंदेंना सांगितलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी गळ घातली होती. 

अखेर या सगळ्या घडामोडीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास आपली तयारी दर्शवली. पण त्यांना भाजप गृहमंत्री पद देणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 
 

    follow whatsapp