Tirupati Balaji: तिरूपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावराची चरबी, सदस्य मिलिंद नार्वेकर म्हणाले, 'मला तर...'

ऋत्विक भालेकर

20 Sep 2024 (अपडेटेड: 20 Sep 2024, 11:35 AM)

Milind Narvekar on Tirupati Balaji Prasad : भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असलेल्या तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

तिरुपती बालाजीच्या प्रसादात तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर

point

तिरूपती बालाजी देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय

point

सदस्य मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

Milind Narvekar on Tirupati Balaji Prasad : भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असलेल्या तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला होता. नायडू यांच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे आणि राजकीय वातावरण देखील तापले आहे. आता यासर्वात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. नार्वेकर तिरूपती बालाजी देवस्थान समितीचे सदस्य आहेत. (tirupati prasad oil animal fat  cm chandrababu naidu allegation jagan reddy shocking news

हे वाचलं का?

सदस्य मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

तिरूपती बालाजी हे भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असून विविध ठिकाणांहून अनेक लोक इथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केलं जातं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. याच लाडूच्या प्रसादात  तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा आरोप नायडू यांनी केला होता. त्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता तपासानंतर अहवाल समोर आला असून त्यात जनावरांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : Tirupati Balaji : खळबळजनक, तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल... रिपोर्टच आला समोर!

 यावर तिरूपती बालाजी देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी 'मला याबाबत माहित नाही', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून, मंदिराचे पावित्र्य...'- आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

'लाडू प्रसाद तयार करण्यासाठी नंदीनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा केला जातो. पण जगन सरकारच्या काळात खासगी कंपनीच्या माध्यमातून स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थाचा पुरवठा होत होता. ही कंपनी स्निग्धता निर्माण करणाऱ्या पदार्थाच्या निर्मितीसाठी गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल याचा वापर करत होती. तेलगू देसम पक्षाचे सरकार आल्यापासून पुन्हा नंदीनी संस्थेमार्फत तुपाचा पुरवठा सुरू केला आहे. मंदिराचे पावित्र्य जपले जात आहे,' असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.

    follow whatsapp