Varun Sardesai Banner : वरुण सरदेसाई होणार आमदार? ठाकरे गटाने डोंबिवलीत फोडला राजकीय बॉम्ब

मुंबई तक

23 Sep 2024 (अपडेटेड: 23 Sep 2024, 10:00 AM)

Varun Sardesai Birthday Update :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभर शिवसेनेची (ठाकरे गट) मोट बांधण्यासा सुरुवात केली. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ठाकरे कुटुंबाला पाठींबा दर्शवला.

Shivsena Thackeray Group latest News

Varun Sardesai Birthday Update

follow google news

बातम्या हायलाइट

point

वरुण देसाईंच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिलं मोठं गिफ्ट

point

'या' मतदारसंघातून वरूण सरदेसाई आमदार होणार?

point

...म्हणून वरुण सरदेसाईंची राजकीय वर्तुळात होतेय तुफान चर्चा

Varun Sardesai Birthday Update :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभर शिवसेनेची (ठाकरे गट) मोट बांधण्यासा सुरुवात केली. बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी ठाकरे कुटुंबाला पाठींबा दर्शवला. पण राजकारणात नव्याने उभारी घेतलेले युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही मातोश्रीवर असलेले नातं आणखी घट्ट केलं. ठाकरे गटाच्या राजकीय कार्यक्रमात किंवा आंदोलनात नेहमीच सक्रीय असणारे सरदेसाई राजकीय वर्तुळात प्रकाशझोतात आले आहेत. (Uddhav Thackeray started organizing Shiv Sena (Thackeray group) protests across the state including Mumbai. Many senior workers who were inspired by Balasaheb's thoughts reflected the Thackeray family's legacy)

हे वाचलं का?

आज 23 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीतील स्टेशन परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. सरदेसाई यांचा भावी आमदार म्हणून या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आले आहे.वरूण सरदेसाई हे मुळचे डोंबिवलीकर आहेत, ज्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते डोंबिवलीतून निवडणूक लढवणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. सरदेसाई यांच्या वाढदिवसामुळे त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबत स्थानिक जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा >> Horoscope In Marathi : पार्टनरच्या शोधात आहात? 'या' राशीच्या लोकांचं नशीब खुलणार

त्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजवण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने डोंबिवलीत राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेना बालेकिल्ला आहे. पण आता डोंबिवलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावी आमदार'अशा आशयाचे बॅनर लावले आहेत. सरदेसाईंचे अशाप्रकारचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट मोठा राजकीय भूकंप करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे ही वाचा >>  Maharashtra Weather: सावधान! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना आज मुसधार पावसचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट

काही महिन्यांपूर्वी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी आक्रमक भूमिका घेत राणे यांच्या जुहू बंगल्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या संख्येत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी राणे-ठाकरे समर्थक आमने-सामने भिडले होते. वरुण सरदेसाई यांनी राणेंच्या विरोधात घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण ठरली. सरदेसाईंची शिवसेनेवर असलेली निष्ठा पाहून उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांचा विशेष सत्कार केला होता.

    follow whatsapp