Maharashtra Survey Poll: पुन्हा येणार महायुतीचं सरकार, पण... बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल

मुंबई तक

17 Aug 2024 (अपडेटेड: 17 Aug 2024, 01:40 PM)

Maharashtra Opinion Poll: आज महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर कोणाचे सरकार स्थापन होणार, कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा एक ओपिनियन पोल समोर आला आहे. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.

महाराष्ट्रातील जनतेला बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल

महाराष्ट्रातील जनतेला बुचकळ्यात टाकणारा ओपिनियन पोल

follow google news

बातम्या हायलाइट

point

नव्या ओपिनियन पोलने वाढवली महाविकास आघाडीची डोकेदुखी

point

राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, ओपिनियन पोलचा अंदाज

point

ओपिनियन पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत नाही!

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Opinion Poll: मुंबई: राज्यात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. आहेत. त्यामुळे आता राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. टाइम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीसाठी मॅट्रिझने (MATRIZE)सर्व्हे केला आहे. ज्यानुसार, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (vidhan sabha election 2024 big blow to mva the mahayuti government will come again in maharashtra opinion poll that confuses people of the state what does the opinion poll say)

हे वाचलं का?

सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील साडेचार हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले आहेत. मागील 5 वर्षातील बदलेली राजकीय समीकरणं लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

हे ही वाचा>> Anil Deshmukh : शरद पवारांनी 'तो' इशारा दिला होता, नाशिकच्या हिंसाचाराच्या घटनेवर अनिल देशमुख काय म्हणाले?

राज्यातील राजकीय समीकरणं ही खूपच गुंतागुंतीची झाली आहेत. एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील MVA आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महाआघाडीत भाजपसोबत आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) काँग्रेससोबत आहेत.

दरम्यान, सर्व्हेची जी आकडेवारी समोर आली आहे त्याने मविआची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते. कारण आज घडीला जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते असं चित्र आहे. पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळेल असं सर्व्हेत दिसत नाही. बहुमतसाठी जो 145 चा आकडा आहे त्यापासून महायुती काहीशी दूर असल्याचं सर्व्हेत दिसतं आहे.

हे ही वाचा>> Assembly Election 2024 : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार? महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे

दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र, 100 च्या आसपास जागांवरच विजय मिळवू शकेल असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. 

जर या सर्व्हेनुसार विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आले तर मात्र, पुन्हा एकदा राजकीय गोंधळ हा महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतो. 

सर्व्हेतील महत्त्वाचे प्रश्न:

1. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या कामकाजाबद्दल तुमचे मत काय आहे?

  • खूप चांगली कामगिरी -35%
  • सरासरी कामकाज - 21%
  • अजिबात चांगली नाही - 30%
  • काही सांगता येत नाही - 14%

2. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) भूमिकेबाबत तुमचे काय मत आहे?

  • राष्ट्रवादी (अजित पवार) निर्णायक भूमिका बजावणार - 34%
  • कोणतीही विशेष भूमिका नाही - 28%
  • भूमिका सरासरी असेल - 24%
  • काही सांगू शकत नाही - 14%

3. महायुतीने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबत तुमचे काय मत आहे?

  • निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल - 41%
  • नुकसान सहन करावे लागू शकते - 33%
  • कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही - 16%
  • सांगू शकत नाही - 10%

4. MVA ने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याबाबत तुमचे मत काय आहे?

  • निवडणुकीत सकारात्मक परिणाम होईल - 32%
  • नुकसान सहन करावे लागू शकते - 40%
  • कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही - 19%
  • सांगू शकत नाही - 9%

5. माझी लाडकी बहीण योजना किती प्रभावी ठरेल?

  • जास्त नाही - 55%
  • काही लाभ होणार नाही - 10%
  • काही प्रमाणात प्रभावी ठरेल - 21%
  • सांगता येत नाही - 8%
  • प्रचाराची एक पद्धत - 6%

6. निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल?

  • मुख्यमंत्री पदाचा उमेदवार – 32%
  • रोजगार – 16%
  • युती - 29%
  • आरक्षण - 23%

7. अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत एकत्र येऊ शकतात?

  • होय - 41%
  • नाही - 36%
  • सांगू शकत नाही - 23%

8. तुमचा आवडता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे?

  • एकनाथ शिंदे - 27%
  • देवेंद्र फडणवीस - 21%
  • उद्धव ठाकरे - 23%
  • शरद पवार - 9%
  • इतर - 20

9. मतांची टक्केवारी आणि जागा

महायुतीमधील कोणत्या पक्षांना किती जागा आणि मतं मिळतील...

भाजप- 

  • मतांची टक्केवारी : 25.8%
  • जागा: 95-100

शिवसेना (शिंदे गट)-

  • मतांची टक्केवारी: 14.2%
  • जागा: 19-24

राष्ट्रवादी (अजित पवार)-

  • मतांची टक्केवारी : 5.2%
  • जागा: 7-12

महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षांना किती जागा आणि मतं मिळतील...

काँग्रेस -

  • मतांची टक्केवारी : 18.6%
  • जागा: 42-47

शिवसेना ( ठाकरे गट) -

  • मतांची टक्केवारी: 17.6%
  • जागा: 26-31

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) -

  • मतांची टक्केवारी: 6.2%
  • जागा: 23-28

इतर

    follow whatsapp