NCP: ‘माझा सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर..,’ उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

मुंबई तक

04 May 2023 (अपडेटेड: 04 May 2023, 11:09 AM)

Uddhav Thackeray: मी दिलेला सल्ला शरद पवारांना पचनी नाही पडला तर? अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना दिली आहे.

what if sharad pawar doesnt digest my advice why did uddhav thackeray say

what if sharad pawar doesnt digest my advice why did uddhav thackeray say

follow google news

मुंबई: ‘शरद पवार यांना मी कसा सल्ला देणार? तो त्यांच्या पक्षाचा अतंर्गत विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी दिलेला सल्ला पवारांना पचनी नाही पडला तर काय करु?’ असा मिश्किल सवाल शिवेसना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) पत्रकार परिषद बोलावली होती. त्याचवेळी त्यांना शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत (Sharad Pawar Resignation) विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपला सल्ला त्यांच्या पचनी पडणार नाही असं म्हटलं आहे. (what if sharad pawar doesnt digest my advice why did uddhav thackeray say )

हे वाचलं का?

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वतुर्ळात बराच गदारोळ पाहायला मिळत आहे. याचबाबत आज उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

‘मला असं वाटतं की, प्रत्येक पक्षामध्ये काही बदल करण्याचा अधिकार त्यांच्या अध्यक्षाला असतात. अद्यापही तिथे निर्णयाप्रत कोणीही आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय होऊ द्या. मग काय बोलायचं ते मी बोलेन. पण महाविकास आघाडीला तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल असं मला वाटत नाही.’

हे ही वाचा >> Shalini Patil : “सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा, अजित पवारांना अटक होऊ शकते”

‘आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहण्याचा अधिकार असतो. पण मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. म्हणूनच मला वाटतं की, महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की, या पलिकडे मी याबाबत काही बोलणं योग्य नाही.’

‘मी तूर्त एवढंच म्हणेन मी माझ्या मतावर ठाम आहे. माझी मतं मी ठामपणे मांडली आहेत. मांडणार आहे तूर्त कोणताही परिस्थितीत महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी घेईन.’

हे ही वाचा >> Maharashtra Politics : शरद पवार यूटर्न घेणार? 24 तासांतच नवा गुगली

‘मोदींचा नाही.. मी व्यक्तीचा पराभव करायला कधीच मानत नाही. तर वृत्तीचा पराभव करायला बघतो. म्हणूनच हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी देशातील पक्षाने नव्हे तर जनतेने एकत्र आलं पाहिजे.’

‘मी जसं तुम्हाला सांगितलं की, प्रामाणिकपणे.. पहिले त्यांची पंक्षातर्गंत जी काही घडामोड आहे.. त्यांना अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचा.. दुसरं कार्यकर्त्यांचा देखील त्यांच्यावर तेवढाच अधिकार आहे. यामुळे सगळ्यांचा हिताचा जो काही निर्णय असेल ते तो घेतील. दुसरी गोष्ट मी कसा सल्ला देणार त्यांना.. परत मी दिलेला सल्ला त्यांना पचनी नाही पडला तर काय करू?’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

    follow whatsapp