ब्रिटनमधील मुलीशी लग्न, भिंद्रनवाल्याशी तुलना; कोण आहे अमृतपाल सिंग?

मुंबई तक

24 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 10:40 PM)

Who is amritpal singh? : पंजाबमधील अमृतसरमध्ये ‘वारीस पंजाब दे’ (Waris punjab de organisation ) संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपाल याच्या समर्थकांनी (Attack on ajanala police station) अजनाळा पोलिस ठाण्यावर हल्ला केला. (6 police injured) या घटनेत 6 पोलीस जखमी झाले आहेत. अमृतपाल सिंग म्हणतो की, आमच्या एका सहकाऱ्याला (लवप्रीत […]

Mumbaitak
follow google news

Who is amritpal singh? : पंजाबमधील अमृतसरमध्ये ‘वारीस पंजाब दे’ (Waris punjab de organisation ) संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी गुरुवारी गोंधळ घातला. अमृतपाल याच्या समर्थकांनी (Attack on ajanala police station) अजनाळा पोलिस ठाण्यावर हल्ला केला. (6 police injured) या घटनेत 6 पोलीस जखमी झाले आहेत. अमृतपाल सिंग म्हणतो की, आमच्या एका सहकाऱ्याला (लवप्रीत तुफान) पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे, तो निर्दोष आहे. त्याचा छळ केला जात आहे. एफआयआरमधून नाव न काढल्यास पोलीस स्टेशनला घेराव घालण्याची धमकी अमृतपाल सिंग याने दिली होती. जाणून घ्या कोण आहेत अमृतपाल सिंग? Know who is Amritpal Singh?

हे वाचलं का?

Amritpal Singh: तलवारी आणि बंदुका घेऊन पोलीस स्टेशनवर कब्जा; नेमकं काय घडलं?

खलिस्तानी विचारसरणीचा समर्थक अमृतपाल सिंग (३० वर्षे) पंजाबमध्ये ‘वारीस पंजाब दे’ ही संघटना चालवतो. ही संघटना अभिनेता, दीप सिद्धू यांनी स्थापन केली होती. नंतर 15 फेब्रुवारी 2022 रोजी दीप सिद्धूचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी दुबईहून परतलेल्या अमृतपाल सिंग याने या संघटनेची कमान हाती घेतली आणि तो त्याचा प्रमुख झाला.

शेतकरी चळवळीतही त्याने रस दाखवला. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर ‘वारीस पंजाब दे’ वेबसाइट तयार करून लोकांना जोडण्यास सुरुवात केली. अमृतपाल 2012 मध्ये दुबईला गेला होता. तेथे त्याने वाहतुकीचा व्यवसाय केला. त्याचे बहुतेक नातेवाईक दुबईत राहतात. अमृतपालने गावातील शाळेतच सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

गुरुद्वाऱ्यातील खुर्च्या आणि सोफे जाळल्यामुळे चर्चेत आला होता अमृतपाल

अमृतपाल अनेकदा आपल्या सशस्त्र समर्थकांसह पंजाबमध्ये सक्रिय दिसतो. अमृतपाल गेल्या वर्षी प्रकाशझोतात आला जेव्हा त्याच्या समर्थकांनी जालंधरमधील मॉडेल टाऊन गुरुद्वारामध्ये खुर्च्या जाळल्या. गुरुद्वारामध्ये भाविकांसाठी खुर्च्या आणि सोफा ठेवण्यास माझा विरोध आहे, कारण ते शीख धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, असे त्याने म्हटले होते. अमृतपाल म्हणाला होता की, आपण गुरु साहिबांच्या बरोबरीने बसू शकतो का? येथे खुर्च्या आणि सोफे बसवून गुरुद्वाराला राजवाडा बनवण्यात आला आहे.

त्यानंतर समर्थकांनी धारदार शस्त्रांनी सर्व खुर्च्या आणि सोफ्यांच्या गाद्या फाडल्या. सर्व खुर्च्या आणि सोफे गुरुद्वाराबाहेर फेकण्यात आले आणि त्यावर तेल टाकून जाळण्यात आले. अलीकडेच अमृतपाल याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धमकी दिली आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणेच त्यांनाही सामोरे जावे लागेल, असे सांगितले.

सुधीर सुरी हत्या प्रकरणातही नाव समोर आले होते

अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक मानला जातो. समानतेमुळे त्याला भिंद्रनवाले 2.0 म्हटले जात आहे. पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्या प्रकरणातही अमृतपालचे नाव पुढे आले होते. सुधीर सुरी यांच्या कुटुंबीयांनीही या हत्या प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला मोगाच्या सिंगवाला गावात नजरकैदेत ठेवले.

भिंद्रनवाल्याशी तुलना का?

29 सप्टेंबर 2022 रोजी ‘वारीस पंजाब दे’ संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त मोगा जिल्ह्यातील रोडे गावात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संस्थेच्या प्रमुखपदी अमृतपाल याची नियुक्ती करण्यात आली. जरनैलसिंग भिंद्रनवाले याचे मूळ गाव असल्याने स्थळाची निवड अत्यंत मोक्याची होती असे मानले जाते. भिंद्रनवालेप्रमाणेच अमृतपालही निळ्या रंगाचा गोल फेटा घालतो. पांढऱ्या कपड्यात एक छोटा साबर ठेवतो आणि भडकाऊ भाषणेही देतो, हे कट्टरपंथी शीख तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

Indira Gandhi : पक्षातून हकालपट्टी झाली, चिन्ह गेलं; तरीही उधळला होता विजयाचा गुलाल

ब्रिटनच्या मुलीशी नुकतंच केलं लग्न

अमृतपाल सिंग हा अमृतसरजवळील जल्लूपूर खेडा गावचा रहिवासी आहे. तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी तो प्रक्षोभक भाषणे देतो, असे त्याच्याबद्दल बोलले जाते. अमृतपाल सिंग याने 10 फेब्रुवारी रोजी यूकेस्थित एनआरआय मुलगी किरणदीप कौरशी मूळ गावी जल्लूपूर खेडा येथे एका साध्या सोहळ्यात विवाह केला. अमृतसरमधील बाबा बकालाच्या गुरुद्वारात आयोजित ‘आनंद कारज’मध्ये दोन्ही बाजूचे कुटुंबीय उपस्थित होते. किरणदीपचे कुटुंब मूळचे जालंधरच्या कुलरण गावचे आहे.

अमृतपालला घेऊनएवढी मवाळ भूमिका का? : भाजप

यापूर्वी अमृतपाल सिंग याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्थिती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी होईल, असे सांगून वाद निर्माण केला होता. या विधानावर भारतीय जनता पक्षाने हल्लाबोल केला. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सरकार अमृतपाल सिंग यांच्याबाबत मवाळ का आहे, असा सवाल पक्षाचे प्रवक्ते आरपी सिंग खालसा यांनी केला.

    follow whatsapp