Virat kohli and anushka sharma : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात भारताला (india) 9 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना थोडा धक्का बसला आहे. आता 9 मार्चपासून होणार्या अहमदाबाद (Ahmadabad) कसोटी सामना जिंकून भारतीय संघाला अंतिम फेरीत (Final) सहज प्रवेश करण्याची संधी असेल. Star cricketer Virat Kohli reached Ujjain with his wife Anushka after the third Test defeat.
ADVERTISEMENT
Virat Kohli चा अलिबागमधील 6 कोटींचा Luxury बंगला! पाहा Exclusive Photo
तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर स्टार क्रिकेटर विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत उज्जैनला पोहोचला. यादरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शनिवारी (04 मार्च) सकाळी महाकालच्या दरबारात हजेरी लावली. विराट आणि अनुष्कानेही भस्म आरतीमध्ये भाग घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने गळ्यात रुद्राक्षाची जपमाळ आणि पारंपरिक धोती घातली होती. यासोबतच त्यांच्या कपाळावर चंदनाचा लेपही लावलेला होता.
अलीकडच्या काही महिन्यांत विराट कोहली अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आहे. विराट कोहली यावर्षी जानेवारी महिन्यात वृंदावनला गेला होता. यादरम्यान त्याने वृंदावनमध्ये श्री परमानंदजींचा आशीर्वाद घेतला होता. विशेष बाब म्हणजे वृंदावनहून परतल्यानंतर कोहलीने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शतक झळकावले. विराट-अनुष्का जानेवारी महिन्यातच ऋषिकेशच्या दयानंद गिरी आश्रमात देखील पोहोचले होते. तिथे दोघांनी एका धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता.
Virat Kohli : सचिनच्या 100 शतकांचा रेकॉर्ड विराट कोहली तोडू शकतो का?
कोहली कसोटीत कधी फॉर्मात येईल?
34 वर्षीय विराट कोहलीची अलीकडची कसोटी क्रिकेटमध्ये बॅटने केलेली कामगिरी काही खास राहिलेली नाही. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. बघितले तर नोव्हेंबर 2019 नंतर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. म्हणजेच तीन वर्षांहून अधिक काळ भारतीय चाहते त्याच्या कसोटी शतकाची वाट पाहत आहेत.
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू मालिकेत आतापर्यंत एकूण 5 पाच डाव खेळला आहे. ज्यामध्ये त्याच्या 22.20 च्या सरासरीने 111 धावा आहेत. ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही भाग घेतला होता, जिथे त्याच्या बॅटमधून फक्त 45 धावा निघाल्या होत्या.
विराट कोहलीचा कसोटी फॉर्म:
2020: 3 सामने, 116 धावा, 19.33 सरासरी
2021: 11 सामने, 536 धावा, 28.21 सरासरी
2022: 6 सामने, 265 धावा, 26.50 सरासरी
2023: 3 सामने, 111 धावा, 22.20 सरासरी
ADVERTISEMENT