Ind Vs Aus 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका होणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी (Steve Smith) स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. पॅट कमिन्स (Pat cummins) भारतात परतणार नसल्याची पुष्टी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होत आहे. (After the Test, Australia suffered a setback in the ODI series as well)
ADVERTISEMENT
कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपली आई मारियाची काळजी घेण्यासाठी दिल्लीतील दुसऱ्या कसोटीनंतर दौरा सोडला. गेल्या आठवड्यात अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला जात असताना त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले. प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘पॅट परत येणार नाही, आमची सहानुभूती पॅट आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे. तो कठीण परिस्थितीतून जात आहे.
याचाच अर्थ मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केल्यानंतर स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून कायम राहील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अनिर्णित राहिला, ज्यामुळे टीम इंडियाने मालिका २-१ ने जिंकली. इंदूरमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील एक सामना ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
पॅट कमिन्सने गेल्या वर्षी अॅरॉन फिंचच्या निवृत्तीनंतर एकदिवसीय क्रिकेटची कमान हाती घेतली होती, परंतु त्याने आतापर्यंत केवळ दोन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. शुक्रवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेचे महत्त्व वाढले आहे कारण या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक याच देशात खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
पहिला सामना – 17 मार्च, शुक्रवार, मुंबई
दुसरा सामना – 19 मार्च, रविवार, विशाखापट्टणम
तिसरा सामना – 22 मार्च, बुधवार, चेन्नई
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (क), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट
पहिल्या वनडेत रोहित शर्मा उपलब्ध नसेल, हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. दुसरीकडे श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर असेल. अशा परिस्थितीत तो एकदिवसीय मालिकेत उपलब्ध होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो बाहेर पडला तर टीम इंडियाला त्याचा बदली खेळाडू शोधावा लागेल, अशावेळी संजू सॅमसनला वनडे मालिकेत संधी मिळू शकते.
Virat Kohli: आईशप्पथ! कोहलीने सामना सुरू असताना अंपायरलाच केलं ट्रोल
आकडेवारीत ऑस्ट्रेलिया पुढे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांचा विक्रम पाहिल्यास, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 143 सामने झाले आहेत, त्यापैकी 80 ऑस्ट्रेलियाने आणि 53 भारताने जिंकले आहेत. भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकल्यास, दोन्ही संघ एकूण 64 वेळा आमनेसामने आले आहेत, येथे ऑस्ट्रेलियाने 30 आणि भारताने 29 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. आता टीम इंडियाची नजर हा विक्रम सुधारण्यावर असेल, तसेच ही मालिका देखील एकदिवसीय विश्वचषकाची चांगली तयारी करणारी असेल.
IND vs AUS: श्रेयस अय्यरने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT