Ind vs Aus 3rd Test: ऑस्ट्रेलियावर पराभवाचं सावट; हे कारण आलं समोर

मुंबई तक

26 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:02 PM)

India vs Australia 3rd test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यात 1 मार्चपासून इंदूर (Indore) येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील (India lead 2-0 in series against Australia ) पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली […]

Mumbaitak
follow google news

India vs Australia 3rd test: भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (india vs Australia) यांच्यात 1 मार्चपासून इंदूर (Indore) येथे तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना आहे. भारतीय संघाने मालिकेतील (India lead 2-0 in series against Australia ) पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसर्‍या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघातील अनेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. Border-Gavaskar Test Series 2023

हे वाचलं का?

IND vs AUS: रोहित शर्मानं बनवला महारेकॉर्ड, बनला जगातला नंबर वन खेळाडू

त्यामुळे कांगारू संघावर आता पराभवाचे सावट आहे. इंदूर कसोटी हरताच ऑस्ट्रेलियन संघ मालिका गमावेल. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, अॅश्टन एगर, डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल स्वीपसन तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहेत. लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसर्‍या कसोटीतून वगळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कांगारू संघावर पराभवाचे सावट आहे.

तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाचे हे खेळाडू बाहेर

दिल्ली कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतला. चौथ्या कसोटीसाठी तो पुनरागमन करू शकतो. कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ संघाची धुरा सांभाळत आहे. स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या डाव्या कोपराला दुखापत झाली आहे. त्याला हेअरलाइन फ्रॅक्चर झाली होती. वॉर्नरच्या जागी ट्रॅव्हिस हेड सलामी करताना दिसणार आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड खराब फिटनेसमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. अॅश्टन एगर आणि मिचेल स्वेप्सन यांना गेल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आलेले नाही. लान्स मॉरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि टॉड मर्फी यांनाही तिसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवण्याची शक्यता आहे.

या खेळाडूच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन संघाला दिलासा

तिसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन फिट झाला असून आता तो तिसऱ्या कसोटीत खेळेल अशी अपेक्षा आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात कॅमेरून संघाला ताकद पुरवतो. 23 वर्षीय कॅमेरून ग्रीनचे बोट फ्रॅक्चर झाले होते. याच कारणामुळे तो मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकला नाही.

Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघ

पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (व्हीसी) , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

आता तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू कोहनमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ आणि मिचेल स्टार्क.

शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (क), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव , उमेश यादव , जयदेव उनाडकट.

    follow whatsapp