India squad Tests against New Zealand: मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) कसोटी मालिकेसाठी (Test Series) आज (12 नोव्हेंबर) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन याची घोषणा केली आहे. यावेळी पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचसोबत टी-20 चा कर्णधार रोहित शर्मा याला संपूर्ण कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी नेतृत्व मुंबईकर अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) सोपविण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर: अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेट कीपर), केएस भारत (विकेट कीपर), रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांची संघात निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, विराट कोहली हा दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघात असणार आहे. त्यामुळे त्या सामन्यापासून कर्णधारपदाची सूत्र त्यांच्याकडे असणार आहेत.
2 टेस्ट आणि 3 टी-20 सामने
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली टेस्ट 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळविण्यात येणार आहे. तर दुसरा सामना 3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये सुरु होणार आहे. याआधी 17,19 आणि 21 नोव्हेंबरला 3 टी-20 सामने खेळविले जाणार आहेत.
रोहित शर्मासह आणखी कोणा-कोणाला देण्यात आलीए विश्रांती?
टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला या सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहितशिवाय भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांनाही दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय विकेटकीपर रिषभ पंत याला देखील बायो-बबलपासून थोडी विश्रांती मिळावी यासाठी या कसोटी मालिकेपासून दूर ठेवण्यात आलं आहे.
जयंत यादवला मिळाली संधी
अष्टपैलू जयंत यादव याला देखील कसोटी सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. जयंत यादव याने आपला अखेरचा कसोटी सामना फेब्रुवारी 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. 31 वर्षीय जयंत यादवने आतापर्यंत भारतासाठी चार टेस्ट मॅच खेळल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 11 बळी मिळवले आहे. याशिवाय त्याने एक सामन्यात कसोटी शतक देखील झळकावलं आहे.
सध्या न्यूझीलंड संघ फुल फॉर्मात असून त्यांनी टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. याच सामन्यानंतर ते थेट भारतात येणार आहेत. जिथे त्यांना तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत.
Rohit Sharma: ठरलं… भारताच्या टी-20 टीमचा कॅप्टन रोहित शर्माच, न्यूझीलंडविरुद्धच्या सीरीजसाठी संघही जाहीर
भारत-न्यूझीलंड सीरीजचं संपूर्ण वेळापत्रक
-
17 नोव्हेंबर – पहिली टी-20 (जयपूर)
-
19 नोव्हेंबर – दुसरी टी-20 (रांची)
-
21 नोव्हेंबर – तिसरी टी-20 (कोलकाता)
-
पहिली टेस्ट- 25 ते 29 नोव्हेंबर (कानपूर)
-
दुसरी टेस्ट- 3 ते 7 डिसेंबर (कानपूर)
ADVERTISEMENT