गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि विदर्भातील महत्वाच्या शहरांमध्ये निर्बंध कडक केले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा टीम इंडियाला फटका बसण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ३ वन-डे सामन्यांची मालिका पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर खेळवली जाणार आहे. परंतू येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर बीसीसीआय वन-डे सिरीज पुण्याबाहेर हलवण्याच्या विचार करत आहे.
ADVERTISEMENT
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या अहमदाबादमध्ये आहे. अखेरची टेस्ट मॅच खेळवल्यानंतर याच मैदानावर भारतीय संघ ५ टी-२० सामने खेळणार आहे. २३ ते २८ मार्च या दरम्यान भारतीय संघ पुण्यात वन-डे सिरीज खेळणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे सामने हलवण्याची परिस्थिती असल्यास बीसीसीआय आतापासून पर्यायी जागेच्या शोधात आहे.
इंग्लंडच्या भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने खास बायो सिक्युअर बबल तयार केलं आहे. परंतू चेन्नईतल्या पहिल्या टेस्ट मॅचचा अपवाद वगळता दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट मॅचसाठी बीसीसीआयने प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली. त्यामुळे येत्या काही काळात राज्यात कोरोनाची परिस्थिती नेमकी कशी राहतेय याकडे बीसीसीआयचं विशेष लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – युसूफ पठाणची इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती
ADVERTISEMENT