Ankit Chatterjee Breaks Sourav Ganguly Record: 23 जानेवारीपासून सुरु झालेल्या रणजी ट्रॉफीच्या सहाव्या सीजनच्या सामन्यात अंकित चॅटर्जीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दहावीत शिकणाऱ्या या खेळाडूने फक्त 15 वर्ष आणि 361 दिवसात बंगालसाठी पदार्पण केलं आणि याचसोबत सौरव गांगुलीचा 35 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. अंकित रणजी ट्रॉफीत पदार्पण करणारा बंगालमधील सर्वात कमी वयाचा क्रिकेटर बनला आहे. गांगुलीने 17 व्या वर्षात बंगालसाठी पहिला सामना 1989-90 मध्ये खेळला होता. रणजी ट्रॉफीचा हा फायनलचा सामना होता, या सामन्यात बंगालने दिल्लीचा पराभव केला होता.
ADVERTISEMENT
कोण आहे अंकित चॅटर्जी?
अंकित चॅटर्जीने बंगालसाठी रणजी ट्रॉफीच्या डेब्यू मॅचमध्ये हरियाणाचा अनुभवी गोलंदाज अंशुल कंबोजला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह मारून खातं उघडलं. त्याच्या या फटक्याने भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीच्या आठवणींना उजाळा दिला. बनगाव हायस्कूलचा दहावीत शिकणारा विद्यार्थी अंकितच्या रणजी ट्रॉफीतील पदार्पणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
कोलकाताच्या मैदानात पोहोचण्यासाठी अंकित मागील तीन वर्षांपासून दररोज सकाळी साडेतीन वाजता उठतो आणि 4.25 च्या बेनगाव-सियालदह या लोकट्रेनने दोन तास ट्रेनने प्रवास करतो. इतकच नव्हे तर ट्रेन प्रवासानंतर अंकित अर्धा तास पायी चालून कोलकाता मैदानावर पोहोचायचा. त्याचं दिनक्रम रात्री 9 किंवा 10 वाजता संपतं. सामन्याच्या दोन दिवस आधी अंकितला त्याच्या पदार्पणाबाबत समजलं. जेव्हा सलामी फलंदाज आणि इंडिया ए क्रिकेटर अभिमन्यु ईश्वरन हेयरलाईन फ्रॅक्चरच्या कारणामुळे सामन्यातून बाहेर झाला.
हे ही वाचा >> Amit Shah: "फक्त मार्केटिंग करून नेता बनू नका, त्यासाठी जमिनीवर...", सहकार परिषदेत अमित शाहांचा शरद पवारांवर निशाणा
अंकितने न घाबरता या संधीला संयमाने स्वीकारलं. अंकितकडे हा ट्रेडमार्क गुण आहे, असं त्याचे बालपणीचे कोच डोलोन गोल्डरचं म्हणणं आहे. अंकितने सामन्यात सिग्नेचर शॉट (कव्हर ड्राईव्ह) बद्दल म्हटलं, हे माझ्यासाठी सामान्य होतं आणि काल रात्री मला झोपली लागली. मी आक्रमक होण्याबाबत विचार करत नव्हतो. पण चेंडू तो शॉट मारण्यासाठीच होता. यामुळे मी तसं केलं.
स्पोर्ट्स स्टारनुसार, अंकितचे वडील अनूप चॅटर्जी जे बनगावमध्ये ठेकेदार आहेत. त्यांनी मुलगा अंकितच्या क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याबाबत आधीच जाणून घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी अंकितला एक बॅट खरेदी करून दिली होती. अंकित त्याच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मैदानावर खेळायचा. अंकितच्या वडिलांनी म्हटलं, तो आमच्या घराच्या मागच्या मैदानावर खेळायचा आणि त्यावेळी मी त्याचं खेळाप्रती असलेलं प्रेम पाहू शकलो.
हे ही वाचा >> इअरफोन घालणं जीवावर बेतलं.. 16 वर्षांच्या मुलीचा कसा गेला जीव?
ADVERTISEMENT
