अडल्ट स्टारने प्रियकराचा चाकू भोसकून केला खून, नेमकं काय घडलं?

मियामी शहरात ओनली फॅन्स स्टार कॉर्टनी क्लेनी नावाची तरूणी प्रियकर क्रिश्चियन ओबमसेलीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती. त्यांची ओळख नोव्हेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. 3 एप्रिल 2022 रोजी कॉर्टनी क्लेनी फोन करून पोलिसांना म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडला चाकू लागला आहे काहीही करून तुम्ही त्याला वाचवा.’ कॉर्टनीने पोलिसांना सांगितलं, ‘क्रिश्चियन मला […]

laa1

laa1

मुंबई तक

• 01:41 AM • 14 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

मियामी शहरात ओनली फॅन्स स्टार कॉर्टनी क्लेनी नावाची तरूणी प्रियकर क्रिश्चियन ओबमसेलीसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होती.

त्यांची ओळख नोव्हेंबर 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

3 एप्रिल 2022 रोजी कॉर्टनी क्लेनी फोन करून पोलिसांना म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडला चाकू लागला आहे काहीही करून तुम्ही त्याला वाचवा.’

कॉर्टनीने पोलिसांना सांगितलं, ‘क्रिश्चियन मला मारून टाकणार होता म्हणून, मी माझ्या सुरक्षेसाठी त्यला चाकू मारला.’

कॉर्टनीच्या जबाबावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिला अटक केली. तेव्हा ती म्हणाली की, ‘मला अटक केली तर, मी जीव देईन.’

पोलिसांना तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी तिला हवाई येथील एका मानसिक रूग्णालयात पाठवलं.

अशा स्थितीत पोलिसांनी कॉर्टनीविरूद्ध अनेक पुरावे गोळा केले. ज्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली.

पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यानुसार हे स्पष्ट झालं की, हे सुरक्षेसाठी केलेलं नसून ती एक हत्या आहे.

सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. कोर्टनीने डिसेंबर 2022 मध्ये पोलिसांचे पुरावे खोटे ठरवत जामीन अर्जही दाखल केला होता.

पण न्यायालयाने या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत तिला जामीन मिळू शकत नाही हे स्पष्ट केले.

असाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp