ADVERTISEMENT
बांगलादेश संघाचा स्टार खेळाडू Shakib Al Hasan नेहमीच वादात सापडतो.
एकदिवसीय आणि T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू शाकिब पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे.
यावेळी शाकिबने हद्दच पार केली आहे. आपल्याच चाहत्यांना त्याने बेदम मारल्याचं समोर आलं आहे.
शाकिबने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.
पहिल्या T20 मध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर शाकिबने चितगाव येथे एका प्रमोशनल कार्यक्रमात हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात चाहत्यांनी शाकिबला घेरलं. यावेळी एका चाहत्याने शाकिबची टोपी काढून घेतली.
गर्दीत अडकलेल्या शाकिबला चाहत्याचं हे कृत्य आवडलं नाही आणि त्याने टोपी हिसकावून त्याला मारलं.
तसंच, एका व्यक्तीला शाकिबने जोरात ढकलूनही दिलं.
ADVERTISEMENT