Rivaba Jadeja: जामनगर: गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Vidhansabha Election) मतमोजणी अद्यापही सुरू आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजप (BJP) प्रचंड ऐतिहासिक विजय मिळवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप, नरेंद्र मोदी, (Narendra Modi) अमित शाह (Amit Shah) हे चर्चेत आहेत. मात्र, असं असलं तरीही या सगळ्यांपेक्षा गुजरात निवडणूक निकालाच्या दिवशी एका महिला उमेदवाराची प्रचंड चर्चा आहे. एवढंच नव्हे तर ट्विटर आणि गुगल सर्चमध्ये देखील ती सर्वाधिक सर्च केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. ही महिला उमेदवार दुसरी-तिसरी कोणी नसून ती भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) आहे. (even in bjps huge victory in gujarat only rivaba jadeja is in trending)
ADVERTISEMENT
गुजरातमध्ये भाजप प्रचंड मोठा विजय मिळवत असलं तरीही जामनगर उत्तर मतदारसंघाकडे सगळ्याचे डोळे लागून राहिले आहेत. कारण याच मतदारसंघातून रिवाबा जडेजा या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या या मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, रिवाबा जडेजा या मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये रिवाबाने चांगली आघाडी कायम ठेवली आहे.
या जागेवर भाजपच्या रिवाबा जडेजा यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 34319 मते पडली आहेत. मोठी गोष्ट म्हणजे आम आदमी पार्टीचा उमेदवार 15405 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
या मतदारसंघात त्यांच्या विरोधात काँग्रेसचे बिपेंद्र सिंह जडेजा, तर करशनभाई करमूर आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत रिवाबा जडेजा या आमदार होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
Gujarat: हार्दिक, जिग्नेश, अल्पेश.. गुजरात निवडणुकीत ‘या’ तरुण त्रिकुटाची काय आहे अवस्था?
जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबा जडेजा यांच्या विरोधात तिचे सासरे आणि नणदेने प्रचार केला होता. एवढेच नाही तर काँग्रेसचे उमेदवार बिपिन जडेजा यांच्यासाठी लोकांकडून मतेही मागितली होती. अशा स्थितीत या हाय-प्रोफाईल मतदारसंघात निवडणुकीपेक्षा कौटुंबिक मतभेदांचीच अधिक चर्चा झाली.
रिवाबा यांनी जामनगर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यापासून अनेकांची उत्सुकता वाढली होती. जामनगर उत्तर ही भाजपची पारंपरिक जागा मानली जाते. 2017 मध्ये धर्मेंद्र सिंह जडेजा भाजपकडून आमदार झाले, पण यावेळी पक्षाने त्यांच्या जागी रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना संधी दिली. अशा परिस्थितीत पतीचे वडील आणि बहीण नयनाबा जडेजा यांनी रिवाबासमोर बऱ्याच अडचणी निर्माण केल्या होत्या.
गुजरात निवडणूक निकालाचा शरद पवारांनी सांगितला राजकीय अर्थ; म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात…’
रिवाबा जडेजाने मेकॅनिकल इंजिनीअरचे शिक्षण घेतले आहे. 2016 मध्ये रिवाबाने भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजासोबत लग्न केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रिवाबान भाजपमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रिय झाल्या. तीन वर्षांनंतर भाजपने त्यांना जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाही पत्नीच्या समर्थनार्थ जनतेकडून मते मागताना दिसला, मात्र त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसचा प्रचार केला.
रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजाने निवडणूक प्रचारादरम्यान वहिनी रिवाबा जडेजा यांच्यावर अनेक आरोप केले होते. नयनाबाने रिवाबावर निवडणूक प्रचारासाठी मुलांचा वापर केल्याचा आरोप केला होता. हा बालमजुरीचा प्रकार असल्याचे नयनाबा यांनी सांगितले होते. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. नयनाबाच्या म्हणण्यानुसार, रिवाबा सहानुभूती मिळविण्यासाठी निवडणुकीत मुलांचा वापर करत होती.
दरम्यान, या सगळ्या आरोपानंतरही येथील मतदारांनी रिवाबा जडेजाच्या पारड्यात भरभरुन मतं टाकली असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता रिवाबा यांची पुढची इनिंग त्या आमदार म्हणून सुरु होईल आणि त्या तिथं नेमकी कशी कामगिरी करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहील.
ADVERTISEMENT