दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर २ मे रोजी पार पडलेल्या RR vs SRH सामन्यात बनावट आयडी कार्डाद्वारे बायो सिक्युअर बबलचं कवच मोडून प्रवेश करणाऱ्या दोघांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटकेत असलेले दोन्ही आरोपी बेटींगच्या उद्देशाने मैदानात आल्याचं कळतंय. राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या एका पथकाला क्रिशन गर्ग आणि मनिष कन्सल हे दोन व्यक्ती स्टेडीयममध्ये दिसले. या दोघांची चौकशी केली असता पोलिसांना संशय आला. यानंतर दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
ADVERTISEMENT
आयपीएलमध्ये बायो सिक्युअर बबलचा भंग झाल्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ ची स्पर्धा स्थगित केली आहे. KKR च्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर, CSK च्या बॉलिंग कोच लक्ष्मीपती बालाजी, बॅटींग कोच माईक हसी, सीईओ काशी विश्वनाथन, बसचालक, दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा, सनराईजर्स हैदराबादच्या वृद्धीमान साहा यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगितीचा निर्णय घेतला.
IPL 2021 रद्द झालेलं नाही, सामने होणारच – BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती
“२ मे रोजी दिल्लीत सामना खेळवला जाणार असताना अरुण जेटली मैदानावर दिल्ली पोलिसांचं एक पथक गेट नंबर ८ वरुन VIP Lounge कडे जात होतं. यावेळी या पथकाला VIP गॅलरीत दोन तरुण दिसले ज्यांचा मास्क हा त्यांच्या गळ्यावर होता. दिल्ली पोलिसांनी त्यांना मास्क निट घालण्यासाठी सांगितलं. यानंतर चौकशी केली असता आमच्या पथकाला संशय आला. दोन्ही आरोपी देत असलेली उत्तर समाधानकारक नव्हती. दोघांपैकी एक आरोपी क्रिशन गर्गने आपल्याकडे Accreditation कार्ड असल्याचं सांगितलं. आमच्या पथकाने हे कार्ड तपासलं तर त्याच्यावर JR. ASSISTANT & COMP. SDMC HEALTH & S. No. 0204′ असं लिहीलेलं होतं.” दिल्ली पोलिसांनी IANS शी बोलताना याबद्दल माहिती दिली.
हे कार्ड पाहिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीला त्याचं SDMC चं कार्ड विचारलं असता दोन्ही आरोपी पळून जायला लागले. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडलं. यादरम्यान चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी आपण कोणत्याही सरकारी विभागाशी संबंधित नसून अवैध पद्धतीने त्यांनी हे कार्ड स्टेडीयममध्ये शिरण्यासाठी तयार केल्याचं मान्य केलं. बेटींगच्या उद्देशाने हे आरोपी मैदानात आले होते असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं. दोन्ही आरोपींवर दिल्ली पोलिसांनी कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी याचसोबत IPC च्या ४१९, ४२०, ४६८, ४७१, १८८, २६९, १२० ब, ३४ या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
IPL 2021 स्थगित, BCCI ला दोन हजार कोटींचं नुकसान
ADVERTISEMENT