“सचिनला सगळं माहित आहे” आर्थिक अडचणीत असलेला विनोद कांबळी शोधतोय नोकरी

मुंबई तक

• 08:45 AM • 17 Aug 2022

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे. सचिन तेंडुलकरला माझी परिस्थिती काय आहे ते माहित आहे असं विनोद कांबळीने म्हटलं आहे. विनोद कांबळी सध्या नोकरी शोधतो आहे. विनोद कांबळीचं म्हणणं आहे की सध्याच्या घडीला बीसीसीआय द्वारे मिळणाऱ्या पेन्शनवरच माझी गुजराण होते आहे. बिल्डिंगच्या गेटला कारची ठोकर दिल्याप्रकरणी माजी क्रिकेटर विनोद […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करतो आहे. सचिन तेंडुलकरला माझी परिस्थिती काय आहे ते माहित आहे असं विनोद कांबळीने म्हटलं आहे. विनोद कांबळी सध्या नोकरी शोधतो आहे. विनोद कांबळीचं म्हणणं आहे की सध्याच्या घडीला बीसीसीआय द्वारे मिळणाऱ्या पेन्शनवरच माझी गुजराण होते आहे.

हे वाचलं का?

बिल्डिंगच्या गेटला कारची ठोकर दिल्याप्रकरणी माजी क्रिकेटर विनोद कांबळीला अटक

विनोद कांबळी काय म्हणाला सचिन तेंडुलकरबाबत?

विनोद कांबळीने हेदेखील म्हटलं आहे की माझा क्रिकेटमधला पार्टनर आणि चांगला मित्र असलेला सचिन तेंडुलकर याला माझ्या परिस्थितीबाबत सगळं माहित आहे. मात्र मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करणार नाही कारण त्याने मला आधीच खूपवेळा आणि खूप प्रमाणात मदत केली आहे.

मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितला अन्…; विनोद कांबळीला एक कॉल पडला 1 लाखाला

विनोद कांबळी आर्थिक विवंचनेत का अडकला?

५० वर्षीय विनोद कांबळी २०१९ मध्ये टी २० मुंबई लीगसाठी कोचिंग करत होता. मात्र कोरोना आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या ज्याचा परिणाम विनोद कांबळीच्या आर्थिक परिस्थितीवरही झाला. सध्या विनोद कांबळीला बीसीसीआयकडून ३० हजार रूपये पेन्शन मिळतं त्यावरच त्याची आणि त्याच्या कुटुंबाची गुजराण होते असं त्याने सांगितलं. विनोद कांबळी सचिन तेंडुलकरच्या तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकदामीमध्येही ट्रेनिंग देत होता पण ती अकदामी त्याच्या घरापासून बरीच दूर आहे.

विनोद कांबळीने सांगितली त्याची आर्थिक अडचण

विनोद कांबळीने त्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला मी पहाटे चार वाजता उठत होतो आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर कॅबने जात होतो त्यानंतर संध्याकाळी बीकेसी ग्राऊंडवर कोचिंग करत होतो. माझ्यासाठी हे बरंच कठीण होतं. मात्र आता मी फक्त बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. मिड डेशी बोलताना त्याने ही माहिती दिली. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे नोकरी मागायला गेलो होतो, आता मला आशा आहे की तिकडे तरी मला नोकरी मिळेल.

सचिन तेंडुलकरला तुमच्या या परिस्थितीबाबत माहिती आहे का? असं विचारलं असता विनोद कांबळी म्हणाला की होय सचिनला माझी आर्थिक तंगी, माझी परिस्थिती सगळं माहित आहे. मात्र सचिनकडून मी मदतीची आशा करत नाही कारण त्याने मला आधीच खूपवेळा आणि खूप मदत केली आहे. सचिन माझा खप चांगला मित्र आहे आणि त्याने मला आत्तापर्यंत वेळोवेळी मदत केली आहे असंही विनोद कांबळीने म्हटलं आहे.

विनोद कांबळीने १०४ वन डे सामने खेळले आहेत. १७ टेस्ट मॅच खेळले आहेत. भारतासाठी इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये विनोद कांबळीने ३५६१ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकं टेस्टमधली आहेत तर दोन शतकं वनडेसाठी केली आहेत. विनोद कांबळीने १९९१ मध्ये वन डे डेब्यु केला होता. तर २००० मध्ये शेवटचा वन डे सामना विनोद कांबळी खेळला होता. विनोद कांबळी अजूनही चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच दारू पिऊन गाडी चालवल्याने आणि ती इमारतीच्या गेटला ठोकल्याने तो चर्चेत आला होता.

    follow whatsapp