Ind vs Ban 1st T20: पंड्याने मोडला 'विराट' विक्रम! 'हा' कारनामा करणारा एकमेव फलंदाज

मुंबई तक

07 Oct 2024 (अपडेटेड: 07 Oct 2024, 02:01 PM)

Hardik Pandya Breaks Virat Kohlis Record : जागतिक क्रिकेटमध्ये मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घालून विराट कोहलीनं ठसा उमटवला आहे. विराटच्या नावावर एकाहून एक जबरदस्त विक्रमांची नोंद करण्यात आली आहे.

Ind vs Ban 1st T20 Latest Update

Hardik Pandya Broke Virat Kohli Record

follow google news

बातम्या हायलाइट

point

हार्दिक पंड्याने विराट कोहलीचा 'तो' विक्रम मोडला

point

हार्दिक पंड्याने बांगलादेश विरोधात 16 चेंडूत कुटल्या 39 धावा

point

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Hardik Pandya Breaks Virat Kohlis Record : जागतिक क्रिकेटमध्ये मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घालून विराट कोहलीनं ठसा उमटवला आहे. विराटच्या नावावर एकाहून एक जबरदस्त विक्रमांची नोंद करण्यात आली आहे. परंतु, आता हार्दिकने पंड्याने विराटचा मोठा विक्रम मोडून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विराट हार्दिकचा हा विक्रम मोडू शकत नाही, कारण त्याने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात ग्वालियरच्या माधवराव सिंधिया स्टेडियममध्ये पहिला टी-20 सामना रंगला. या सामन्यात पंड्याने 16 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 39 धावा कुटल्या. पंड्याने मैदानात धावांचा पाऊस पाडून विराटचा विक्रम मोडला. आता पंड्याचा हा विक्रम मोडणं अनेक खेळाडूंसाठी मोठं आव्हान असणार आहे.

हे वाचलं का?

पंड्याने 'विराट' विक्रमाला घातली गवसणी

पंड्याने भारतीय इनिंगच्या 12 व्या षटकात तस्कीन अहमदच्या पाचव्या चेंडूवर मिडविकेटवरून षटकार ठोकला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींनी पंड्याच्या नावाचा जयघोष केला. पण पंड्याच्या षटकाराच्या उंचीने विराटच्या विक्रमावर पाणी फेरलं. ही भारतीय टी-20 च्या मागील 17 वर्षांच्या इतिहासातील पहिली संधी होती, ज्यावेळी एका भारतीय खेळाडूने या फॉर्मेटमध्ये षटकार ठोकून भारताला सामन्यात विजय मिळवून दिला. याआधी विराटने अशी कामगिरी चारवेळा केली आहे.

हे ही वाचा >> Suraj Chavan: कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला 'Bigg Boss Marathi Season 5' चा विनर? वाचा INSIDE STORY

कर्णधार सूर्यकुमार यादव मोडणार पंड्याचा हा विक्रम?

हार्दिक पंड्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. परंतु, हार्दिकचा हा विक्रम यापुढे कोणता फलंदाज मोडू शकतो? असा सवाल क्रिकेटविश्वात पडला आहे. अशातच सूर्यकुमार यादव हार्दिक पंड्याच हा विक्रम मोडू शकतो, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे. 
बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करून 19.5 षटकात अवघ्या 127 धावांवर गारद झाला.

त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सलामीला उतरलेला फंलदाज संजू सॅंमसनने (29) तर अभिषेक शर्माने नाबाद (16) धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादव 29 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर नितीश रेड्डी 16 धावांवर तर या सामन्याचा हिरो हार्दिक पंड्या 16 चेंडूत 39 धावा करून नाबाद राहिला.

    follow whatsapp