Team India Squad for World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप 2023 खेळण्यात व्यस्त आहे. त्यानंतर आता भारतीय संघाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषकाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून (BCCI) संघाची घोषणा करण्यात आली आहे. होणारा वर्ल्ड कप ( World Cup 2023) आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळला जाणार आहे. भारतीय संघाची निवड झाली असली तरी या टीममध्ये मात्र युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली नाही. तर आशिया चषकमध्ये ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून संघात असेलला संजू सॅमसनही यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. तर टिळक वर्मालाही संधी मिळालेली नाही. मात्र याचवेळी एकही सामना न खेळलेला केएल राहुलला विश्वचषकात स्थान मिळाले आहे.
ADVERTISEMENT
एकदिवसीय विश्वचषक 2023 हा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विश्वचषकामध्ये सलामीचा सामना गतविजेता संघ इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. मागच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडही इंग्लंडबरोबरच पराभूत झाले होते. तर यावेळी मात्र विश्वचषक स्पर्धेतील विजेततेपदाचा सामना 19 नोव्हेंर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. निवडसमितीत प्रमुख असेलला अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा या दोघांनीच विश्वचषक 2023 साठी टीम इंियाची घोषणा केली आहे.
हे ही वाचा >> IND Vs PAK Asia Cup 2023: इंडिया पाकिस्तानवर करणार हल्लाबोल, आज हे विक्रम होणार…
टीम इंडिया ; रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद . सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.
केएल राहुलमुळे अनेकांना आश्चर्य ?
या विश्वचषकाची मोठी बातमी म्हणजे केएल राहुल याची संघातील एन्ट्री. त्याला चेन्नईतील 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सलामीच्या सामन्यापूर्वी संघात सहभागी होण्यासाठी तो योग्य असल्याचे सांगितले जाते आहे. त्याला काही दिवसापूर्वी त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. तर आता मात्र तो बेंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तर श्रीलंकेतील आशिया चषकापूर्वी आगामी सामन्यांमध्ये तो टीम इंडियामध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे राहुल संघात आला आहे, आणि संजू सॅमसन बाहेर गेला आहे.
यांना स्थान नाही
आशिया चषक स्पर्धेत टिळक वर्मा आणि कृष्णाही बाहेर आहे. त्यामुळे आता टीम इंडिया रोहित शर्मावरच अवलंबून आहे. भारतीय संघ शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारख्या दिग्गजांनी खेळासाठी सज्ज झाला आहे. त्याबरोबरच ईशान किशनलाही स्थान मिळाले आहे. फलंदाजीवर भर देत अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांचाही संघात समावेश केला गेला आहे.
फिरकी गोलंदाज
या वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर हाही चौथा वेगवान गोलंदाज आहे. कुलदीप यादव हा संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून पर्याय आहे.यावेळी युजवेंद्र चहलपेक्षाही अधिक पसंती मिळाली आहे.
पहिला सामना खेळणार…
भारताकडून वनडे वर्ल्डकप आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन केले होते. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी विश्वचषक 2023 हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईमध्ये होणार आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी सामना रंगणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.
हे ही वाचा >> Asia Cup 2023 : सुनील गावसकरांचं मोठं विधान; केएल राहुलमुळे ‘या’ फलंदाजाला ‘आराम’
विश्वचषक 2023 साठी 45 दिवसांमध्ये 48 सामने खेळवले जाणार आहेत. त्यासााठी 10 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. भारतीय संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये खेळणार आहे. तर पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकात्यात होणार आहे. तर अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबर रोजी होणार असून 20 नोव्हेंबर हा राखीव असणार आहे.
संघात अजूनही बदल होऊ शकतात
भारतासह उर्वरित सर्व 10 देशांच्या संघामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही देशाला त्यांच्या घोषित संघात बदल करायचे असतील तर ते 28 सप्टेंबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करू शकतात असंही होऊ शकतात. मात्र 28 सप्टेंबरपर्यंत त्याला अंतिम 15 सदस्यीय संघ जाहीर करावे लागणार आहे. त्यानंतरच आयसीसीच्या मंजुरीनंतरच बदल करता येणार आहेत.
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक:
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
ADVERTISEMENT