Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीअमवर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सहा वेळा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताच विजयाचं स्वप्न भंगल. तसेच या मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना मैदानावरच अश्रू अनावर झाले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
टीम इंडियाने वर्ल्ड कपचे 10 चे 10 सामने जिंकले होते. 11 वा सामना हा फायनलचा सामना होता आणि या अतिमहत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना मैदानावरच अश्रू अनावर झाले होते. या संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंचं सात्वन केले होते.
हे ही वाचा : टक्कल केलं, सिगारेटने जाळलं अन् निर्वस्त्र… अकोल्यात वासनांध तरूणाचे 14 वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य!
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने यासंबंधित फोटो एक्स या सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या फोटोत मोहम्मद शमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर डोकं ठेऊन उभा आहे. पंतप्रधान मोदी या फोटोत शमीला धीर देताना दिसले आहे. शमीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले की, ‘दुर्दैवाने काल आमचा दिवस नव्हता. संपूर्ण स्पर्धेत आमच्या संघाला आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व भारतीय चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. मी पंतप्रधानांचा आभारी आहे जे विशेषतः ड्रेसिंग रूममध्ये आले आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. तसेच आम्ही लवकरच पुनरागमन करू असे आश्वासनही शमीने भारतीय चाहत्यांना दिले आहे.
टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज रविंद्र जडेजाने देखील नरेंद्र मोदींच्या ड्रेसिंग रूममधील भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आम्ही खुप चांगला वर्ल्ड कप खेळलो. पण फायनलमध्ये आमचा पराभव झाला. त्यामुळे आम्ही दुखी आहोत. पण चाहत्यांच्या पाठिंब्याने आम्हाला दिलासा मिळतोय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूममध्ये आले हे आमच्यासाठी प्रेरणादायी होते.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भुजबळांच्या मागे फडणवीस आहेत का?
दरम्यान पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्वच खेळाडूंची भेट घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंचे हात पकडून त्यांनी धीर दिला. त्याचसोबत इतर खेळाडूंशी देखील हस्तांदोलन करत त्यांचे सात्वने केले. या संपूर्ण भेटीचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीने खेळाडूंना धीर मिळाला आहे.
ADVERTISEMENT
