Viral Video : कुलदीप यादवची कमाल!ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला चकवा देत क्लिन बोल्ड

मुंबई तक

• 07:06 AM • 22 Mar 2023

Kuldeep Yadav India vs Australia : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि चायनामन कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तिसऱ्या वनडेत सामन्यात कमालीची गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अडखळत असल्याचे दिसून आली आहे. या सामन्यात कुलदीप यादवने 3 विकेट घेतले आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला कळालेच नाही […]

Mumbaitak
follow google news

Kuldeep Yadav India vs Australia : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आणि चायनामन कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) तिसऱ्या वनडेत सामन्यात कमालीची गोलंदाजी केली आहे. कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया अडखळत असल्याचे दिसून आली आहे. या सामन्यात कुलदीप यादवने 3 विकेट घेतले आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या विकेटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला कळालेच नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला. (ind vs aus kuldeep yadav magical delivery alex carey clen bold video viral)

हे वाचलं का?

तिसऱ्या वनडे सामन्यात कुलदीप यादवने (Kuldeep Yadav)पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली आहे. याचीच प्रचिती या व्हिडिओमध्ये येते आहे. कुलदीप यादव समोर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅलेक्स कॅरी (Alex carey) फलंदाजी करत होता. यावेळी कुलदीप यादवने असा बॉल टाकला की अॅलेक्स कॅरीला कळालाच नाही आणि तो क्लीन बोल्ड झाला. कुलदीपचा हा बॉल इतका स्विंग झाला की, अॅलेक्सच्या बॅट ला न लागता तो स्टंम्पवर आदळला.

एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूचे एकामागून एक विकेट पडत असताना, अॅलेक्स कॅरी (Alex carey) डाव सांभाळण्यासाठी मैदानात उतरला होता. अॅलेक्स कॅरी चांगल्या फॉर्ममध्ये होता. 38 धावापर्यंत त्याने मजल मारली होती, त्यामुळे अर्धशतक मारले अशी ऑस्ट्रेलियन फॅन्सना अपेक्षा होती.मात्र कुलदीप यादवच्या फिरकीत तो फसला आणि क्लीन बोल्ड झाला. कुलदीपने टाकलेल्या बॉलवर आऊट झाल्याचे त्याला कळाले सुद्धा नाही. काही काळासाठी तो विकेट पडल्यावर स्तंब्ध झाला होता.

Shreyas Iyer : टीम इंडियाला झटका! IPL, WTC मधून श्रेयस राहणार बाहेर, कारण…

दरम्यान कुलदीपच्या (Kuldeep Yadav) या आश्चर्यकारक विकेटचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्याच्या गोलंदाजीचे कौतूक केले आहे. कुलदीपने 10 ओव्हरमध्ये 5.60 च्या इकॉनॉंमीने 56 धावा दिल्या आहेत, तर 3 विकेट काढल्या आहेत. कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्याच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलया बॅकफुटवर गेली होती.

World Cup 2023 Schedule: अहमदाबाद अंतिम सामन्याचा थरार! पाकिस्तान खेळणार का?

टीम इंडियासमोर 270 धावांचे आव्हान

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेविस हेड आणि मिचेश मार्शने चांगली सुरुवात केली होती. मात्र या दोन्ही खेळाडूंना मोठ्या धावा करता आल्या नाही. मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावा केल्या. ट्रेविस हेडने 33 तर अॅलेक्स कॅरीने 38 धावा केल्या आहेत. तर इतर खेळाडू 30 धावांच्या आत आऊट झाले होते. टीम इंडियाने 269 धावात ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट केले आहेत.त्यामुळे टीम इंडियासमोर 270 धावांचे लक्ष्य असणार आहे. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि हार्दीक पंड्याने प्रत्येकी 3 तर सिराज आणि पटेलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहेत.

Virat Kohli: शोएब अख्तरचं मोठं भाकित, म्हणाला, ‘विराट 110 शतक करणार’

    follow whatsapp