Ind vs Eng : टीम इंडियाचा धावांचा डोंगर, इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचं आव्हान

मुंबई तक

• 03:52 PM • 05 Sep 2021

ओव्हल कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर ३६८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाच्या शेपटाने पुन्हा एकदा इंग्लंडला तडाखा देत दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत यांनी फटकेबाजी करुन इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई केली. त्यामुळे हा कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला आता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने […]

Mumbaitak
follow google news

ओव्हल कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर ३६८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाच्या शेपटाने पुन्हा एकदा इंग्लंडला तडाखा देत दुसऱ्या डावात ४६६ धावांपर्यंत मजल मारली. शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत यांनी फटकेबाजी करुन इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई केली. त्यामुळे हा कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला आता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

हे वाचलं का?

विराट कोहली आणि रविंद्र जाडेजाने चौथ्या दिवसाची सावध सुरुवात केली. दोघांची जोडी सेट झाल्यानंतर ख्रिस वोक्सने रविंद्र जाडेजाला आऊट करत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही वोक्सने आपल्या जाळ्यात अडकवलं. अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला, तो भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.

…तेवढ्या Ajinkya Rahane च्या समस्या वाढत जातील, त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटचा विचार करावा – झहीर खान

यानंतर विराट कोहलीलाही मोईन अलीने आपल्या जाळ्याच अडकवलं. विराट कोहली ४४ धावांवर आऊट झाला. यानंतर ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा भागीदारी करुन इंग्लंडच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणले. सातव्या विकेटसाठी शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंतने शतकी भागीदारी केली. शार्दुलने दुसऱ्या डावातही आपलं अर्धशतक साजरं केलं.

ही जोडी इंग्लंडच्या नाकीनऊ आणणार असं वाटत असतानाच कर्णधार जो रुटने शार्दुलला आऊट केलं. यानंतर पंतही मागोमाग माघारी परतला. अखेरीस उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पुन्हा एकदा छोटेखानी भागीदारी रचून इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. अखेरीस भारताचा दुसरा डाव ४६६ धावांवर संपवण्यात इंग्लंडला यश आलं. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३, मोईन अली-ओली रॉबिन्सनने प्रत्येकी २-२ तर अँडरसन-ओव्हर्टन-रुट या त्रिकुटाने १-१ विकेट घेतली.

Ind vs Eng : अंपायरशी वाद घालणं भोवलं, Lokesh Rahul ला दंड

    follow whatsapp