ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने इंग्लंडला दमदार प्रत्युत्तर देत आश्वासक कमबॅक केलं आहे. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये ९९ रन्सची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसाअखेरीस एकही विकेट न गमावता ४३ रन्सपर्यंत मजल मारली आहे. भारत अजुनही ५६ रन्स मागे असल्यामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या बॉलिंग लाईन अपचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर संपवल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. जेम्स अँडरसन, रॉबिन्सन यांच्या बॉलिंगवर रोहित शर्माला आऊट करण्याची संधी इंग्लंडला चालून आली, परंतू या संधीचं सोनं करण्यात ते अपयशी ठरले. यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चांगला जम बसवत भारत एकही विकेट गमावणार नाही याची काळजी घेतली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा २० तर लोकेश राहुल २२ धावांवर खेळत होता.
त्याआधी इंग्लंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी भारताला चांगलंच थकवलं. पोप आणि बेअरस्टो जोडीने सहाव्या विकेटसाठी ८९ रन्सची पार्टनरशीप केली. मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडून इंग्लंडची जमलेली जोडी फोडली. परंतू यानंतर आलेल्या मोईन अली आणि ख्रिस वोक्स यांनीही टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. ऑली पोपने एक बाजू लावून धरत चौफेर फटकेबाजी करत ८१ धावांची इनिंग खेळली. शार्दुल ठाकूरने त्याला आऊट केलं.
यानंतर ख्रिस वोक्स अखेरपर्यंत भारताला झुंद देत राहिला. अखेरीस चोरटी धाव घेण्याच्या नादात तो रनआऊट झाला. भारताकडून उमेश यादवने ३, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ तर मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने १-१ विकेट घेतली.
Ind vs Eng : घुसखोरी करणारा Jarvo पुन्हा मैदानात, इंग्लंडच्या बॅट्समनला येऊन धडकला…पाहा Video
ADVERTISEMENT