World Test Championship चा अंतिम सामना खेळण्यासाठी जून महिन्यात इंग्लंडला जाणाऱ्या टीम इंडियातील स्टार खेळाडू श्रीलंका दौऱ्याला मुकणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना आटोपल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेत ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. खुद्द BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याचे संकेत दिले आहेत. परंतू या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यासारखे स्टार खेळाडू खेळणार नाहीयेत.
ADVERTISEMENT
WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन
१३, १६ आणि १९ जुन रोजी भारतीय संघ वन-डे सामने आणि त्यानंतर २२, २४ आणि २७ जूनला टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. सध्याच्या घडीला भारताच्या श्रीलंदा दौऱ्याचं अशा पद्धतीने प्राथमिक वेळापत्रक आखण्यात आलं आहे, ESPNCricinfo ने यासंदर्भातली माहिती दिली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया याचदरम्यान इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय युवा खेळाडूंना संधी देणार असल्याचं कळतंय. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन यांना श्रीलंका दौऱ्यात संधी मिळू शकते.
उर्वरित सिझन आमच्या इथे आयोजित करा, IPL 2021 साठी BCCI ला पहिली ऑफर
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारताचा वन-डे संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर २८ जुलैला तो श्रीलंकेतून भारताला रवाना होईल. श्रीलंकेतील कोणत्या मैदानावर सामने खेळवले जातील याबद्दल माहिती समजू शकलेली नाही, तरीही हंबनटोटा आणि दम्बुला येखील मैदानावर हे सामने खेळवले जाऊ शकतात. २०१८ साली झालेल्या निदहास ट्रॉफीनंतर भारतीय संघ श्रीलंकेत एकही सामना खेळलेला नाहीये.
इंग्लंड दौऱ्यापूर्वी कॅप्टन कोहलीने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
ADVERTISEMENT