WTC Points Table Latest Update: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये रंगला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी पराभव करून भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. तर 12 वर्षानंतर टीम इंडियाला पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका गमावावी लागली.
ADVERTISEMENT
WTC च्या गुणतालिकेत भारताची स्थिती काय?
पुणे कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या गुणतालिकेत खालच्या स्थानी पोहोचला आहे. पुणे टेस्टच्या आधी भारतीय संघाकडे 68.06 टक्के इतके गुण होते. पुण्यात झालेल्या पराभवानंतर भारताचे गुण 62.82 टक्के झाले आहेत. असं असतानाही भारतीय संघ अजून अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत चौथ्या नंबरवर उडी घेतली आहे.
पुण्यात पराभव झाल्यानंतर भारतीय संघ डब्लूटीसीच्या फायनलमधून बाहेर झाला का? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला होता. पण भारत डब्लूटीसीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावरच असल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, पुण्यात झालेल्या पराभवामुळे भारताची फायनलमध्ये पोहोचण्याची शर्यत थोडी कठीण नक्कीच झाली आहे.
नक्की वाचा >> Gold Rate Today: बाईईई...दिवाळीआधीच 'दिवाळं' निघणार! मुंबईसह 'या' शहरांमध्ये 24 तासातच गडगडले सोन्याचे दर
भारतीय संघाला आता डब्ल्यूटीसीच्या (WTC) टूर्नामेंटआधी आणखी पाच सामने खेळायचे आहेत. अशातच भारताला उरलेल्या 6 सामन्यांमध्ये कमीत कमी 3 सामने जिंकावे लागतील. जर भारताने 4 सामने जिंकले, तर जागा निश्चित होईल. जर 3 सामने जिंकले, तर भारताला दुसऱ्या एखाद्या संघाच्या विजयावर अवलंबून राहावं लागू शकतं. भारतीय संघाला त्यांचे पुढचे सहा सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरोधात खेळायचे आहेत. यामध्ये किवींच्या विरोधात सुरु असलेल्या मालिकेचा शेवटचा सामना राहिला आहे. तर ऑस्ट्रेलिया विरोधात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये 13 सामन्यांमध्ये 8 विजय, 4 पराभव आणि एका ड्रॉ सामन्यामुळे 90 गुणांचा समावेश आहे. त्याची टक्केवारी 62.50 इतकी आहे. तर श्रीलंकेचा संघ तिसऱ्या स्थानावर, न्यूझीलंड चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्टइंडिज नवव्या स्थानावर आहे.
नक्की वाचा >> Ind vs Nz: मिचेल सँटनरच्या फिरकीनं टीम इंडियाला गुंडाळलं! न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच जिंकली 'Test Series'
WTC चं गुणतालिका सिस्टम
- विजयी झाल्यावर 12 गुण
- सामना टाय झाल्यास 6 गुण
- सामना ड्रॉ झाल्यास 4 गुण
- संघाने जिंकलेल्या गुणतालिकेतील टक्केवारीच्या आधारावर रँक केलं जातं.
- टॉप दोन संघ 2025 मध्ये लॉर्ड्समध्ये होणाऱ्या फायनलमध्ये पोहोचणार
- स्लो ओव्हर रेट झाल्यावर गुण कमी होतात
ADVERTISEMENT