Delhi School Bomb Threats : शाळांना येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांमागे विद्यार्थीच? पोलीस आणि पालकही हादरले, घटना काय?

मुंबई तक

22 Dec 2024 (अपडेटेड: 22 Dec 2024, 10:07 AM)

गेल्या 11 दिवसांत बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील 100 हून अधिक शाळांमध्ये गोंधळ उडाला आहे.शाळांना आलेले ईमेल VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) द्वारे पाठवले गेले होते. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण होईल असं विद्यार्थ्यांना वाटत होतं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत शाळांना आलेल्या धमक्यांमागे विद्यार्थीच?

point

परीक्षा टाळण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली

point

पोलीस आणि पालक अक्षरश: हादरले...

Delhi Schools Bomb Threat Case : अलीकडेच दिल्लीतील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. जवळपास तीन शाळांना आलेल्या धमक्या या  त्या शाळेतील विद्यार्थ्य्यांनीच दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या शाळांपैकी एक म्हणजे व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूल. 28 नोव्हेंबर रोजी रोहिणी प्रशांत विहार पीव्हीआर मल्टिप्लेक्सजवळ झालेल्या स्फोटाच्या एक दिवस आधीच या शाळेला धमकीचा ईमेल आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा ईमेल शाळेत -शिकणाऱ्या भाऊ-बहिणींनीच पाठवला होता. परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी असं केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Partywise Portfolio Allocation: भाजपकडे गृह, महसूल.. महायुतीत कोणत्या पक्षाकडे कोणती खाती?

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, समुपदेशनादरम्यान, दोन्ही विद्यार्थ्यांनी हे सांगितलं की शाळांना येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांच्या पूर्वीच्या घटनांवरून त्यांच्या मनात ही कल्पना आली होती. त्यानंतर त्यांच्या पालकांनी ताकीद दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं आहे. 

रोहिणी आणि पश्चिम विहारमध्ये असलेल्या आणखी दोन शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांनीच धमकीचे ईमेल पाठवले होते. यामागचे कारण म्हणजे शाळा बंदच राहावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा होती.

11 दिवसांत 100 हून अधिक शाळांना धमक्या

हे ही वाचा >>NCP Portfolio list: भाजपची अजितदादांवर मेहरनजर? दिली 'वजनदार' खाती!

गेल्या 11 दिवसांत बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील 100 हून अधिक शाळांमध्ये गोंधळ उडाला आहे.शाळांना आलेले ईमेल VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) द्वारे पाठवले गेले होते. त्यामुळे गुन्हेगारांचा शोध घेणं कठीण होईल असं विद्यार्थ्यांना वाटत होतं. या वर्षी मे महिन्यापासून बॉम्बच्या धमकीच्या 50 हून अधिक ईमेलने फक्त शाळांमध्येच नाही तर दिल्लीतील रुग्णालयं, विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहं.

    follow whatsapp