Virat Kohli, Ind Vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहली हा या सामन्यात खेळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल हा संघाचं नेतृत्व करत आहे.
ADVERTISEMENT
केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, ‘विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.’
विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा 100वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा त्याचा 99वा सामना असेल आणि 100 व्या कसोटी सामन्यासाठी आता त्याला पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.
प्लेइंग-11 बद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या ऐवजी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हनुमा विहारी दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा सामना खेळला होता.
शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली
विराट कोहली दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यानंतर त्याच्या शतकाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. आता कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो की नाही हे देखील पाहावे लागणार आहे.
कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने ईडन गार्डन्सवर 136 धावांची शानदार खेळी खेळली होती. त्या शतकानंतर कोहलीने कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या एकूण 60 डावांमध्ये मिळून एकही शतक झळकावलेले नाही.
Kohli ची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, पहिल्यांदाच निवड समितीची बाजू आली समोर; चेतन शर्मा म्हणाले…
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल व्हर्न (विकेटकीपर), मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआने ऑलिव्हर लुंगी एनगिडी.
ADVERTISEMENT