आयपीएलच्या चौदाव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा विजयरथ रोखण्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) ला यश आलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नईने RCB चा ६९ रन्सने धुव्वा उडवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. रविंद्र जाडेजाने अष्टपैलू कामगिरी करत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
ADVERTISEMENT
IPL 2021 : ‘सर जाडेजा’ चमकले, एकाच ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत RCB च्या बॉलरची धुलाई
महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी आश्वासक भागीदारी करत चेन्नईला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ७४ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर चहलने गायकवाडला आऊट केलं, ऋतुराजने ३३ रन्स केल्या. दुसऱ्या बाजूने फाफ डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हर्षल पटेलने एकाच ओव्हरमध्ये सुरेश रैना आणि फाफ डु-प्लेसिसची विकेट घेत चेन्नईला बॅकफूटला ढकललं.
चांगली सुरुवात केल्यानंतरही मधल्या ओव्हर्समध्ये RCB च्या बॉलर्सनी दमदार पुनरागमन केलं. परंतू अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकून बसलेल्या रविंद्र जाडेजाने हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये ५ सिक्सची आतिषबाजी करत ३७ रन्स कुटल्या. या जोरावर चेन्नईने १९१ रन्सचा टप्पा गाठला.
IPL 2021 : जाडेजाची फटकेबाजी, Purple Cap Holder हर्षल पटेलच्या नावावर नकोसा विक्रम
प्रत्युत्तरादाखल RCB ची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि देवदत पडीक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ रन्सची पार्टनरशीप केली. सॅम करनने विराट कोहलीला आऊट करत RCB ला पहिला धक्का दिला. यानंतर शार्दुल ठाकूरने फॉर्मात असलेल्या देवदत पडीक्कलला ३४ रन्सवर आऊट करत चेन्नईला आणखी एक यश मिळवून दिलं. यानंतर RCB च्या डावाला गळती लागली. ग्लेन मॅक्सवेल आणि जेमिन्सनचा अपवाद वगळता मधल्या फळीतला एकही बॅट्समन आश्वासक खेळी करु शकला नाही. अखेरीस ६९ रन्सनी सामना जिंकत चेन्नईने RCB ला चौदाव्या हंगामात पहिल्यांदा पराभवाचा धक्का दिला.
ADVERTISEMENT