IPL 2021 : जाडेजाची फटकेबाजी, Purple Cap Holder हर्षल पटेलच्या नावावर नकोसा विक्रम

मुंबई तक

• 01:26 PM • 25 Apr 2021

मुंबईच्या वानखेडे मैदानावर रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने RCB विरुद्ध सामन्यात १९१ पर्यंत मजल मारली. रविंद्र जाडेजाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. जाडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत ३७ रन्स काढल्या. रविंद्र जाडेजाच्या या फटकेबाजीमुळे यंदाच्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेलच्या नावावर नकोशा […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या वानखेडे मैदानावर रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने RCB विरुद्ध सामन्यात १९१ पर्यंत मजल मारली. रविंद्र जाडेजाने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपलं महत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. जाडेजाने हर्षल पटेलच्या अखेरच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत ३७ रन्स काढल्या.

हे वाचलं का?

रविंद्र जाडेजाच्या या फटकेबाजीमुळे यंदाच्या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या हर्षल पटेलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात हर्षल पटेल सर्वात महागडी ओव्हर टाकणारा बॉलर ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये १५ विकेट घेत हर्षस पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. RCB चा संघ बॉलिंग करत असताना एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत हर्षलने चांगली सुरुवातही केली होती. परंतू जाडेजाच्या एका ओव्हरने सामन्याचं चित्रच पालटलं.

रविंद्र जाडेजाने २८ बॉलमध्ये ४ फोर आणि ५ सिक्स लगावत नाबाद ६२ रन्स केल्या. बॅटिंग व्यतिरीक्त बॉलिंग आणि फिल्डींगमध्येही जाडेजाने आपली चमक दाखवली. ४ ओव्हरमध्ये १३ रन्स देत जाडेजाने २ महत्वपूर्ण विकेट घेतल्या आणि एक सुरेख रनआऊटही केला.

याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये एकाच ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावणाऱ्या मोजक्या बॅट्समनच्या यादीतही जाडेजाला स्थान मिळालं आहे.

हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाने अशी केली फटकेबाजी –

  • पहिला बॉल : डिप-मिडवेकिटच्या दिशेने सिक्स

  • दुसरा बॉल : यॉर्कर टाकण्याचा हर्षलचा प्रयत्न फसला, जाडेजाने आणखी एक सिक्स लगावला

  • तिसरा बॉल : हर्षल पटेलचा नो-बॉल…जाडेजाने पुन्हा डिप-मिडविकेटच्या दिशेने लगावला सिक्स

  • तिसरा बॉल* : रविंद्र जाडेजाचा आणखी एक सिक्स

  • चौथा बॉल : एक्स्ट्रा कव्हरच्या पोजिशनवर जाडेजाची कॅच घेण्याची संधी RCB ने सोडली, दोन रन्स काढत जाडेजा पुन्हा स्ट्राईकवर

  • पाचवा बॉल : जाडेजाचा आणखी एक उत्तुंग षटकार

  • सहावा बॉल : अखेरच्या बॉलवर चौकार लगावत जाडेजाने एकाच ओव्हरमध्ये वसूल केल्या ३७ रन्स

    follow whatsapp