IPL 2021 : ‘सर जाडेजा’ चमकले, एकाच ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत RCB च्या बॉलरची धुलाई

मुंबई तक

• 12:15 PM • 25 Apr 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाने धडाकेबाज खेळी केली आहे. हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत जाडेजाने चेन्नई सुपरकिंग्जला पहिल्या इनिंगमध्ये १९१ रन्सचा टप्पा गाठून दिला. हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाने मैदानात आतिषबाजी करत ३७ रन्स कुटल्या. महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिसने […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणारा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाने धडाकेबाज खेळी केली आहे. हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये ५ सिक्स लगावत जाडेजाने चेन्नई सुपरकिंग्जला पहिल्या इनिंगमध्ये १९१ रन्सचा टप्पा गाठून दिला. हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाने मैदानात आतिषबाजी करत ३७ रन्स कुटल्या.

हे वाचलं का?

महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिसने चांगली सुरुवात करुन दिल्यानंतर मधल्या ओव्हर्समध्ये चेन्नईचा डाव कोलमडला. एका क्षणाला चेन्नईचा संघ २०० चा टप्पा गाठेल असं वाटत होतं, परंतू RCB च्या बॉलर्सनी मधल्या ओव्हर्समध्ये टिच्चून मारा करत चेन्नईच्या धावगतीला वेसण घातली. परंतू रविंद्र जाडेजाने अखेरच्या ओव्हरमध्ये सामन्याचं सगळं चित्रच पालटून टाकलं.

हर्षल पटेलच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जाडेजाने अशी केली फटकेबाजी –

  • पहिला बॉल : डिप-मिडवेकिटच्या दिशेने सिक्स

  • दुसरा बॉल : यॉर्कर टाकण्याचा हर्षलचा प्रयत्न फसला, जाडेजाने आणखी एक सिक्स लगावला

  • तिसरा बॉल : हर्षल पटेलचा नो-बॉल…जाडेजाने पुन्हा डिप-मिडविकेटच्या दिशेने लगावला सिक्स

  • तिसरा बॉल* : रविंद्र जाडेजाचा आणखी एक सिक्स

  • चौथा बॉल : एक्स्ट्रा कव्हरच्या पोजिशनवर जाडेजाची कॅच घेण्याची संधी RCB ने सोडली, दोन रन्स काढत जाडेजा पुन्हा स्ट्राईकवर

  • पाचवा बॉल : जाडेजाचा आणखी एक उत्तुंग षटकार

  • सहावा बॉल : अखेरच्या बॉलवर चौकार लगावत जाडेजाने एकाच ओव्हरमध्ये वसूल केल्या ३७ रन्स

रविंद्र जाडेजाच्या या खेळीने सामन्याचं संपूर्ण चित्रच पालटलं. जाडेजाने २८ बॉलमध्ये ४ फोर आणि ५ सिक्स लगावत नाबाद ६२ रन्स केल्या. RCB कडून हर्षल पटेलने ३ तर चहलने १ विकेट घेतली.

    follow whatsapp