महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत अजिंक्यची अनोखी मदत, ‘मिशन वायू’साठी ३० Oxygen Concentrators दान

मुंबई तक

• 12:51 PM • 01 May 2021

महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या खडतर काळात समाजाच्या विविध स्तरातील लोकं सरकारी आणि आरोग्य यंत्रणांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रा दिनाचं औचित्य साधत मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मिशन वायू या उपक्रमासाठी ३० Oxygen concentrators दान केले आहेत. IPL 2021 : खेळाडूंकडून मदतीचा ओघ वाढला, निकोलस पूरनची Corona विरुद्ध लढ्याला आर्थिक […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या खडतर काळात समाजाच्या विविध स्तरातील लोकं सरकारी आणि आरोग्य यंत्रणांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्रा दिनाचं औचित्य साधत मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने मिशन वायू या उपक्रमासाठी ३० Oxygen concentrators दान केले आहेत.

हे वाचलं का?

IPL 2021 : खेळाडूंकडून मदतीचा ओघ वाढला, निकोलस पूरनची Corona विरुद्ध लढ्याला आर्थिक मदत

Mahratta Chamber of Commerce ने अजिंक्यने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले असून अजिंक्यची ही मदत राज्याच्या ग्रामीण भागात मिशन वायू अंतर्गत पोहचवली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण येताना दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालयात ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अजिंक्य रहाणेव्यतिरीक्त आतापर्यंत पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन या खेळाडूंनी भारतातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाविरुद्ध लढाईत मदत म्हणून आर्थिक हातभार लावला आहे.

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

भारताच्या कसोटी संघाचा उप-कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा हिस्सा आहे. परंतू सुरुवातीच्या काही सामन्यांचा अपवाद वगळता अजिंक्यला यंदा दिल्लीच्या संघात आपलं स्थान मिळवता आलेलं नाहीये. यंदा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत असून सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत ७ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

    follow whatsapp