आयपीएलचा उर्वरित हंगाम बीसीसीआय युएईत खेळवणार आहे. याआधी हा हंगाम भारतात खेळवला जात होता. परंतू बायो सिक्युअर बबलचा झालेला भंग आणि त्यातून काही खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळे बीसीसीआयने हा हंगाम मध्येच स्थगित केला. आयपीएलचा उर्वरित हंगाम आणि टी-२० विश्वचषक यंदा युएईत आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने कोरोनामुळे यंदाच्या स्पर्धेवर सावट येऊ नये यासाठी जय्यत तयारी करायला सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी एक Health Advisory तयार केली आहे. ज्यात खेळाडूंसाठी यंदा Bluetooth Band नसून प्रत्येक संघासाठी एक Bubble Integraty officer ची नेमणूक करावी लागणार आहे. खेळाडू बायो सिक्युअर बबलच्या बाहेर जात नाहीत यावर लक्ष ठेवण्यासाठी ब्ल्यू टूथ बँड देण्यात आले होते. परंतू भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात या बँडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे यंदा बीसीसीआयने ही अधिक काळजी घेण्याचं ठरवलंय.
“यंदा बीसीसीआयने Contact tracing साठी Bluetooth Band वापरण्याची कल्पना रद्द केली आहे. प्रत्येकवेळा खेळाडू कुठे जातो यावर लक्ष ठेवणं हे या बँडच्या माध्यमातून शक्य होत नसल्याचं आम्हाला समजलं आहे. तसेच पहिल्या टप्प्यात काही ठिकाणी हे बँड तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले होते. त्यामुळे यापुढे Bubble Integrity office प्रत्येक संघासोबत असेल जो त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवेल.” बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने ANI शी बोलताना माहिती दिली.
IPL 2021 : १९ सप्टेंबरपासून उर्वरित हंगामाला सुरुवात, MI vs CSK मध्ये रंगणार पहिला सामना
४ मे ला आयपीएल सामन्यादरम्यान काही संघांमध्ये खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं. यानंतर बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित करुन उर्वरित हंगाम युएईत आयोजित करायचं ठरवलं. या हंगामाचे उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबीत खेळवले जाणार आहेत. प्रत्येक बायो बबलमधील सदस्यांना प्रवासासाठी एक वेगळं वाहन देण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table
१९ सप्टेंबरपासून आयपीएलचा उर्वरित सिझन सुरु होणार असून मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने या हंगामाला सुरुवात होईल. काही संघांनी या स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. जे भारतीय खेळाडू सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत ते तिकडून युएईत दाखल होणार असून ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर ते सरावात सहभागी होऊ शकणार आहेत. यासाठीही बीसीसीआयने नियम स्पष्ट केले आहेत.
IPL 2021 साठी टीम ओनर्सची तयारी सुरु, UAE मध्ये हॉटेल बुकींगला सुरुवात
“प्रत्येक संघाचा खेळाडू बायो सिक्युअर बबलमध्ये प्रवेश करण्याआधी ६ दिवस स्वतःला क्वारंटाइन करेल. युएईत दाखल झाल्यानंतर आणि ट्रेनिंग कँपमध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येक खेळाडूची RTPCR चाचणी होईल. यंदा बीसीसीआयने १४ बायो सिक्युअर बबल तयार करण्याचा निर्णय घेतला असून ८ बबल ही संघांसाठी ३ बबल ही अंपायर-सामनाधिकारी व इतर सदस्यांसाठी तर उर्वरित ३ बबल ही प्रक्षेपणासाठी आलेल्या चॅनलच्या प्रतिनिधींसाठी तयार करण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असून चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु तिसऱ्या तर गतविजेता मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे.
ADVERTISEMENT